Panjim Carnival Dainik Gomantak
गोवा

Panjim Carnival: पणजी कार्निव्हलचे रोहित मोन्सेरात अध्यक्ष

Panjim Carnival: उपाध्यक्षपद मनपा आयुक्तांकडेच: 10 फेब्रुवारीला पणजीत मिरवणूक

दैनिक गोमन्तक

Panjim Carnival: पणजीत फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कार्निव्हल आयोजनासाठी महानगरपालिकेची गतवर्षी असणारी समिती कायम ठेवण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद महापौर रोहित मोन्सेरात यांच्याकडे असून, उपाध्यक्षपद आयुक्त क्लेन मेदेरा यांच्याकडे कायम आहे.

पर्यटन खात्याच्यावतीने मंत्री रोहन खंवटे यांनी राज्यात होणाऱ्या कार्निव्हल आणि शिगमोत्सव मिरवणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या होत्या. त्यातील पणजीतील कार्निव्हल मिरवणूक अर्थात ‘फ्लोट परेड’ 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर चर्च परिसरातील गार्सिया गार्डनशेजारी निर्माण केल्या जाणाऱ्या सांबा स्क्वेअरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या सांबा स्क्वेअरमधील कार्यक्रमांसाठी महापालिकेच्यावतीने शुल्क आकारले जाते. पर्यटक आणि स्थानिकांसाठी येथील कार्यक्रम आकर्षण असतात. शिवाय तिथे उभारल्या जाणाऱ्या शितपेयांच्या, मद्यांच्या व खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलवर मध्यरात्रीपर्यंत गर्दी असते. स्टॉलधारकांना आकारल्या जाणाऱ्या भाडेपट्टीतून आणि तिकीट विक्रीतून महापालिकेला चांगला महसूल मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT