Rohan Khaunte  Dainik Gomantak 
गोवा

Rohan Khaunte : नवी अधिसूचना फायदेशीर

पर्यटन उद्योग नोंदणी सुटसुटीत

दैनिक गोमन्तक

पणजी : नोंदणी नसलेल्या उपक्रमांमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्राचे नुकसान होत आहे. जलक्रीडासारख्या उपक्रमांची पर्यटन व्यावसायिक नोंदणी टाळत असल्याने राज्य सरकारचा महसूल बुडत होता, तसेच बेकायदेशीर गोष्टीही वाढत होत्या. आता पर्यटन उद्योगात सुसूत्रता येण्यासाठी केलेल्या नव्या कायद्यामुळे असे व्यवहार होणार नाहीत, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले. पर्वरीतील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

व्यवसाय सुलभतेबाबत पर्यटन खात्याची नवीन अधिसूचना नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण आणि कमी कागदपत्रांसह ऐतिहासिक आहे. पूर्वी अर्जदार नोंदणी प्रक्रियेसाठी वेळ वाया घालवायचे आणि त्यामुळेच लोक त्यांच्या व्यावसायिक क्रियाकलापांची नोंदणी टाळत होते. खात्याकडे त्यांच्या उपक्रमांची नोंदणी करण्यासाठी त्यांना 15 दिवसांचा अवधी दिला असल्याचे खंवटे यांनी स्पष्ट केले.

व्यापार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, परंतु पर्यटन उद्योगाशी संबंधित उपक्रमांची नोंदणी केली नाही, दंड आणि साहित्य जप्त केले जाईल, असा इशारा खंवटे यांनी दिला.

पर्यटन सेवा कागदपत्रे कमी करण्याचा निर्णय

राज्य सरकारने या आठवड्यात व्यवसाय सुलभतेच्या दृष्टिकोनातून नोंदणी, नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करून विविध पर्यटन सेवांचे कागदपत्रीय दस्तावेज कमी केले आहेत. नवीन नोंदणी, नूतनीकरणासाठी सध्या आवश्यक असलेल्या विविध पर्यटन सेवांशी संबंधित कागदपत्रे, सुधारित कागदपत्रे तर्कसंगत करण्याचा आणि कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पर्यटन खात्याच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

SCROLL FOR NEXT