Rohan Khaunte Dainik Gomantak 
गोवा

Rohan Khaunte : ‘डोन्ट ड्रिंक ॲण्ड ड्राईव्‍ह’ ही भूमिका योग्‍यच

या निर्णयाचा राज्‍यातील पर्यटनालाही लाभ होईल, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

पणजी : कोणताही कायदा लोकांच्‍या भल्‍यासाठीच असतो. लोकांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. सरकारची ‘नो ड्रिंक नो ड्राईव्‍ह’ ही भूमिका योग्‍यच आहे. या निर्णयाचा राज्‍यातील पर्यटनालाही लाभ होईल, असे मत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केले. येथील एका कार्यक्रमात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

‘घरी तुमची कोणीतरी वाट पाहात आहे... वाहन सावकाश चालवा’ अशा सूचना अनेकदा रस्‍त्‍याकडेला दिसतात. पण याकडे दुर्लक्ष केले जाते. मद्यप्राशन केल्‍यानंतर लोकांनी वाहन चालवूच नये. वाहतुकीच्‍या नियमांचे पालन करावे. तसेच वाहनांच्‍या वेगावरही नियंत्रण ठेवावे, असे आवाहन मंत्री खंवटे यांनी यावेळी केले. वाहन चालविताना प्रत्‍येकाने आपापली काळजी घ्यायला हवी. तरच अपघातांचे आणि अपघातांत मृत्‍यू होण्याचे प्रमाण कमी होईल.

आपले राज्‍य जागतिक पर्यटनस्‍थळ आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटक आपल्‍याकडे येतात. पण गेली दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटनपूरक उद्योगांचे आणि किनाऱ्यावरील शॅकचालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो असून शॅकचालकांना आणखी एक वर्षे मुदत वाढवून देण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्‍याचे मंत्र्यांनी सांगितले.

संगीत महोत्सव चार दिवसांचा

तसेच पर्यटनपूरक उद्योग-व्‍यापारास चालना देण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्‍वाही खंवटे यांनी यावेळी दिली. हणजूण येथे आयोजित केला जाणार संगीत महोत्‍सव तीनऐवजी चार दिवसांचा करावा, अशी सूचना आयोजकांना केली आहे. कारण त्‍या काळात राज्‍यात पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. जास्‍तीत जास्‍त पर्यटकांना या महोत्‍सवाचा लाभ घेता यावा, अशी आमची भूमिका असल्‍याचे ते म्‍हणाले.

क्रीडा पर्यटनास चालना देणार

राज्‍यातील क्रीडा पर्यटनास चालना देण्यात येणार असून यासाठी बीच व्‍हॉलिबॉल, बीच क्रिकेट स्‍पर्धा आयोजित करण्यात येतील. याबाबत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्‍याशी चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशीही विचारविनिमय करण्यात येईल आणि क्रीडा, पर्यटनवाढीसाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT