Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

'सावर्डेतील रस्‍ते करणार गुळगुळीत'

मंत्री राणे: 12 किमीच्‍या रस्‍ताकामाचा प्रारंभ; 2.30 कोटींचा खर्च

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: सत्तरी तालुक्यातील सावर्डे पंचायत क्षेत्रातील सर्व रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. जवळपास 12 किलोमीटर रस्त्याच्‍या या कामावर सुमारे 2 कोटी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ स्थानिक आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वाळपई सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे साहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर व ग्रामस्‍थांची उपस्‍थिती होती. आमदार विश्‍वजीत राणे यांनी खास प्रयत्न करून या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. यामुळेच सावर्डे पंचायत क्षेत्रातील सुमारे 12 किमी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला होता. या पंचायत क्षेत्रातील अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला होता.

त्यामुळे सदर ठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात यावे अशा प्रकारची मागणी सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत होती. सावर्डे पंचायतीतर्फे या संदर्भाचा ठराव मंजूर करून तो पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली व आजपासून या कामाला सुरुवात झालेली आहे. दरम्‍यान, वाळपई मतदारसंघात चार ग्रामपंचायती व एका नगरपालिकेचा समावेश आहे.

पंधरा दिवसांत काम होणार पूर्ण!

सावर्डेचे सरपंच अशोक च्‍यारी म्‍हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने नागरिकांकडून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशा प्रकारची मागणी करण्यात येत होती. त्याला अखेर मंजुरी मिळाली व आजपासून प्रत्‍यक्षात कामाला प्रारंभ झाला. पंधरा दिवसांमध्ये सदर डांबरीकरण पूर्ण होणार असून त्यानंतर सावर्डे पंचायत क्षेत्रातील खराब रस्त्यांची समस्‍या मार्गी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT