Road Safety Week  Dainik Gomantak
गोवा

Road Safety Week : साखळीत पथनाट्यातून रस्ता सुरक्षेबाबत जागृती : पालिकेचा उपक्रम

हेल्मेट, सीटबेल्ट, मद्यपान करून गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, तिघेजण बसून दुचाकी हाकणे अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.

गोमन्तक डिजिटल टीम

Road Safety Week : साखळी ता. ११ (प्रतिनिधी) : येथील पालिकेतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जागृती मोहीम राबवण्यात आली. येथील बसस्थानकावर सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून वाहतूक नियमांची माहिती दिली.

हेल्मेट, सीटबेल्ट, मद्यपान करून गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, तिघेजण बसून दुचाकी हाकणे अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेविका दीपा जल्मी, वाहतूक पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक गोपाळ केरकर, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक समीर प्रभू, नितीश नाईक, समिता कुलकर्णी, श्रध्दाली बेटकर व इतरांची उपस्थिती होती.

पथनाट्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात विना हेल्मेट दुचाकीचालकांना अडवून नगराध्यक्षा रश्मी देसाई व इतरांनी हेल्मेट परिधान करण्याचे महत्त्व सांगून जागृती पत्रके वितरित केली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकही उपस्थित होते.

वाहतूक नियम पाळा : देसाई

रस्त्यावर वाहने चालवत असताना आपल्या एका चुकीमुळे गंभीर अपघात घडू शकतो. त्यात एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. त्यासाठी वाहने चालवताना सदैव संयम ठेवावा.

आपल्या व इतरांच्याही सुरक्षिततेसाठी वाहतूक नियम पाळत सुरक्षित वाहने चालवावीत, असे आवाहन नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT