Goa News: राज्यातील रस्त्यांच्या झालेल्या खराब परिस्थितीबद्दल लोक वारंवार बोलत असतात, मात्र पणजी महानगरपालिकेपासून २०० मीटरवर असलेल्या भाजप मुख्यालयासमोरील रस्ताच सध्या वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री तसेच पक्षाचे केंद्रीय नेते भेट देत असतात आणि मुख्यमंत्री, मंत्री, सभापती, खासदार, आमदार देखील कार्यालयात वारंवार ये-जा करतात, तरीदेखील त्यांना रास्ता दुरुस्त करावा असे वाटत नसल्याने लोकांच्या समस्या सरकार काय समजून घेणार असा प्रश्न जनतेला पडला आहे. गोव्याची पहिली स्मार्ट सिटी म्हणून पणजीची ओळख आहे.
विकासाचे काम सुरू असले तरी नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा स्मार्ट सिटीच्या दर्जाच्या नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे भाजपच्या पणजी शहरातील मुख्यालयासमोरील रस्ता आहे.
पणजी महानगरपालिकेपासून फक्त २०० मीटर अंतरावर असूनही, हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. वाहतूक धोक्यात आणणारा हा रस्ता, स्थानिकांसाठी आणि पणजीत कार्यालयात कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
भाजप कार्यालयासमोरील हा रस्ता मुख्य रस्ता असल्याने यावरून दिवसाला हजारोंच्या संख्येने गाड्या जातात. सरकारची रस्त्यांसंदर्भात भूमिका मुख्यमंत्र्यांनी कितीही स्पष्ट केली, तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारवाईवरून अधिकारी रस्ते दुरुस्त करण्यात गंभीर असल्याचे दिसून येत नाही.
संबंधित खात्याचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत तरीही अधिकारी त्यांचे ऐकत नाही की, त्यांना गंभीर घेत नाही असे अनेक प्रश्न आज जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.
लोकांत आश्चर्यया भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री, पक्षाचे केंद्रीय नेते, मुख्यमंत्री, मंत्री, सभापती, खासदार आणि आमदार असे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी ये-जा करत असतात. भाजप सरकार असल्याने भाजप कार्यालयासमोरील रस्ता तरी सरकारने दुरुस्त करायला हवा होता. तरीही, या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही याचे आश्चर्य वाटते अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.