Accident in Khandepar Ponda Dainik Gomantak
गोवा

खांडेपारमध्ये मालवाहू टॅकची रिक्षाला धडक

भीषण अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी, गाडीचंही मोठं नुकसान

दैनिक गोमन्तक

फोंडा : गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच खांडेपार येथील जुन्या पुलावर शुक्रवारी रात्री अपघात झाला ज्यात चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात आणखी एका व्यक्तीला किरकोळ इजा झाली आहे. दोघांवरही उपचार सुरु आहेत. (Accident in Khandepar Ponda News Updates)

फोंडा परिसरातील खांडेपार येथे शुक्रवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) मालवाहू ट्रक आणि रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली. मध्यरात्री झालेल्या अपघातात कोल्हापूरहून आलेला रिक्षाचालक किरण रेडकर गंभीर जखमी झाला आहे, तर विजय हेगडे नावाचा व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात एवढा भीषण होता की रिक्षाच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे.

दरम्यान मागच्याच आठवड्यात ओल्ड गोवा (Old Goa) परिसरात एका तरुणाचा माड कोसळून अपघात झाला होता. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर बांबोळी परिसरात गोमेकॉसमोर (GMC) एक भरधाव प्रवासी बस उलटून अपघात झाला होता, ज्यात बसमधील प्रवासी जखमी झाले होते आणि चालक गंभीर जखमी झाला होता. फर्मागुडीमध्येही दुचाकीचालक कंटेनरखाली आल्याने अपघात झाला होता. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्याच्या पत्नीवर उपचार सुरु होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT