Ro-Ro Ferryboat Goa Dainik Gomantak
गोवा

Ro-Ro Ferryboat Goa: सहा-सात महिन्यांत रो-रो फेरीबोटी गोमन्तकीयांच्या सेवेत

या बोटी बांधण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती नदीपरिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Ro-Ro Ferryboat Goa

नदीपरिवहन खात्याच्या वतीने जलमार्गावरील वाहतूक सुरळीत करणे आणि सध्याच्या फेरीबोटींवरील ताण कमी करण्यासाठी सहा-सात महिन्यांत रो-रो फेरीबोटींचा सेवेत समावेश करण्यात येणार आहे.

या बोटी बांधण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती नदीपरिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

खात्याच्या वतीने आज शनिवारी सकाळी नव्याने बांधणी केलेल्या 'मांडवी' आणि 'दूधसागर' या दोन फेरीबोटींचे मंत्री फळदेसाई यांच्या हस्ते पणजी जेटीवर जलावतरण करण्यात आले.

याप्रसंगी आमदार केदार नाईक, आमदार प्रमेंद्र शेट, बंदर कप्तान विभागाचे कॅप्टन विकास गावणेकर व मान्यवरांची उपस्थिती होती. राज्यात 18 ठिकाणी फेरीबोट सेवा सुरू आहे. त्यात या नव्या दोन फेरीबोटींमुळे त्यांची संख्या 35 वर पोहोचली आहे.

दोन्ही फेरीबोटी बांधण्यासाठी 2 कोटी 36 लाख 20 हजार 600 रुपये खर्च आला आहे. या नव्या फेरीबोटींची वेगमर्यादा 7 नॉट्स आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT