RJD Goa joins JDU welcomed by party national president Lalan Singh Dainik Gomantak
गोवा

गोव्यात RJD ला खिंडार, नितीश कुमारांचा लालू प्रसादांना दे धक्का

गोवा आरजेडीचे अध्यक्ष अहमद कादर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस अफाक अहमद खान यांच्या उपस्थितीत दिल्लीतील जंतरमंतर येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पक्षात प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दलाला (RJD) मोठा झटका बसला आहे. पक्षाची गोवा युनिट बिहारमधील सत्ताधारी जनता दल युनायटेड (JDU) मध्ये विलीन झाले आहे. गोवा आरजेडीचे अध्यक्ष अहमद कादर आणि इतर पदाधिकारी जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस अफाक अहमद खान यांच्या उपस्थितीत दिल्लीतील जंतरमंतर येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते.

जेडीयूने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात अहमद कादर यांच्या नेतृत्वाखाली आरजेडीचे फ्रान्सिस कोलासो, अँथनी परेरा, अनूप सिन्हा, अशोक जांबोडकर आणि रझिया शेख यांनी पक्षात विलीन झाल्याचा दावा केला आहे. प्रसिद्धीनुसार, अहमद कादर यांची गोव्यातील जेडीयू युनिटच्या अध्यक्षपदी, जांबोडकर यांची उपाध्यक्षपदी, सिन्हा यांची सरचिटणीसपदी आणि शेख यांची महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या विलीनीकरणामुळे आणि गोव्यातील नेत्यांना देण्यात आलेली नवी जबाबदारी गोव्यातील जेडीयूच्या तळागाळातील संघटना मजबूत करेल आणि पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत सकारात्मक दिशेने एक नवीन सुरुवात करेल, असे मतही पक्षाने व्यक्त केले आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी गोव्यातील आरजेडी युनिटच्या जेडीयूमध्ये एकत्रीकरणाचे स्वागत केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT