River Rafting Goa Dainik Gomantak
गोवा

River Rafting Goa : म्हादईच्या प्रवाहावर ‘व्हाईट वाॅटर राफ्टिंग’चा थरार; देशी-विदेशी पर्यटक सहभागी

आजपासून प्रारंभ ; ग्रामीण पर्यटनाला सरकारकडून प्रोत्साहन

गोमन्तक डिजिटल टीम

River Rafting Goa : गोवा पर्यटन विकास महामंडळ व ब्रिटिश ॲडव्हेंचर स्पोर्ट्‌स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या गोवा सरकारच्या व्हाईट वॉटर राफ्टिंगला शनिवार, ८ रोजीपासून सुरवात करण्यात येणार आहे. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे पर्यटकांना या खेळाची वाट पाहावी लागली.

आता पावसाचा जोर वाढल्याने शनिवार(ता.८)पासून राफ्टिंग सुरू होणार असल्याने साहसी पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे. शनिवारी सकाळी १० वाजता उस्ते-सत्तरी येथील म्हादई नदीच्या पात्रातून उद्‌घाटन करण्यात येईल. यावेळी नगरगावच्या सरपंच संध्या खाडीलकर व इतर पंचसदस्यांची उपस्थिती असणार आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे-सत्तरी या ठिकाणी म्हादई नदीच्या प्रवाहावर काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी व्हाईट वॉटर राफ्टिंग या प्रकल्पाला सुरवात केली होती.

सातत्याने मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर यंदाही या प्रकल्पाला पावसाळी मोसमास शनिवारपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. धावे-सत्तरी येथून या प्रवासाला सुरवात करण्यात आल्यानंतर १० किलोमीटरचे अंतर दीड तासांमध्ये पूर्ण करून सावर्डे-तार येथे समाप्ती करण्यात येत असते. यामुळे पर्यटकांना म्हादई नदीच्या दऱ्याखोऱ्यात असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घेण्याची चांगली संधी निर्माण होते.

साहसी लोकांचा सहभाग

अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात साहसी पर्यटक या खेळात भाग घेतात. यामध्ये देशी तसेच परदेशी पर्यटकांचाही प्रामुख्याने समावेश होतो. म्हादई नदीचा प्रवाह साहसी पर्यटनासाठी अत्यंत उपयुक्त असल्याने सरकारने ग्रामीण भागातील पर्यटनाला संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने याची सुरुवात केलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

VIDEO: हॉर्मुझची सामुद्रधुनी बनली 'युद्धभूमी'! इराणी नौदलाला अमेरिकेचा मोठा दणका, 16 जहाजे केली उद्ध्वस्त; थरारक व्हिडिओ व्हायरल

Panaji Election: पणजीवासीय सूज्ञपणा दाखवतील का? सडेतोड नायक Watch Video

Mhaje Ghar: 'म्हजे घर'बाबतीत नवी अपडेट! सुनावणी 1 एप्रिलपर्यंत लांबणीवर; याचिकाकर्त्याच्या पात्रतेवर सरकारचा आक्षेप

SCROLL FOR NEXT