Temperature In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोमंतकीयांनो काळजी घ्या! उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात; दुपारी घराबाहेर पडणे झाले अवघड

Temperature In Goa: राज्याच्या काही भागांत पहाटेच्या वेळी सौम्य थंडीचा अनुभव येत असला, तरी सकाळी दहा वाजल्यानंतर उष्म्याची तीव्रता झपाट्याने वाढत आहे.

Sameer Panditrao

Goa climate update : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, हे तापमान सरासरीपेक्षा सुमारे २ अंश सेल्सिअसने अधिक आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे.

राज्याच्या काही भागांत पहाटेच्या वेळी सौम्य थंडीचा अनुभव येत असला, तरी सकाळी दहा वाजल्यानंतर उष्म्याची तीव्रता झपाट्याने वाढत आहे. दुपारच्या वेळेत सूर्यकिरण अधिक तीव्र होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड होत आहे.

विशेषतः दुपारी रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

या काळात कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे तसेच उन्हापासून संरक्षण करणारे उपाय करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT