Goa Crime Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Crime Cases: गोव्यात अल्‍पवयीन मुलींवरील लैंगिक अत्‍याचार वाढले : आवदा व्‍हिएगस

Goa Crime Cases: शाळेतील विद्यार्थिंनींना ब्लॅकमेल करून करतात लक्ष्‍य

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime Cases

हल्‍लीच्‍या काळात दक्षिण गोव्‍यात शाळेत जाणाऱ्या अल्‍पवयीन मुलींना वेगवेगळी आमिषे दाखवून त्‍यांच्‍यावर लैंगिक अत्‍याचार करण्‍याच्‍या घटना वाढल्‍या आहेत.

हे अत्‍याचार करणारे या अल्‍पवयीन मुलींचे आक्षेपार्ह स्‍थितीतील व्‍हिडिओ तयार करतात आणि त्‍यानंतर त्‍यांना त्‍याद्वारे ब्‍लॅकमेल केले जाते, अशी माहिती दक्षिण गोव्‍यातील ‘वन स्‍टॉप’ केंद्राच्‍या संचालिका आवदा व्‍हिएगस यांनी दिली.

मायणा-कुडतरी पाेलिस स्‍थानकाच्‍या कक्षेत एका १५ वर्षीय अल्‍पवयीन विद्यार्थिनीला लग्‍नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय युवकाने तिच्यावर लैंगिक अत्‍याचार केल्‍याची घटना समोर आली असून सध्‍या त्या युवकाला अटक करण्यात आली आहे.

या युवकाचे या अल्‍पवयीन मुलीशी मागची दाेन वर्षे संबंध होते. वेगवेगळी आमिषे दाखवून ताे तिच्‍यावर अत्‍याचार करत असल्‍याचे आता समोर आल्याची माहिती आवदा व्‍हिएगस यांनी दिली.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींना अशा फसव्या युवकांकडून लक्ष्‍य केले जाते. या विद्यार्थिनींना शाळेत येत असतानाच वाटेतूनच हे युवक आपल्यासोबत घेऊन जातात, असे आतापर्यंतच्‍या प्रकरणांत दिसून आले आहे. त्‍यामुळे आता या अशा गोष्‍टींकडे शाळेतील शिक्षकांनीही लक्ष दिले पाहिजे. कुठलीही विद्यार्थिनी वर्गात गैरहजर राहिल्‍यास त्‍यांच्‍या पालकांना बाेलावून त्‍यांना त्‍याची कल्‍पना दिली पाहिजे.

- आवदा व्हिएगस, ‘वन स्‍टॉप’च्‍या संचालिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT