Rickshaw motorcycle pilot on road in Bicholim Dainik Gomantak
गोवा

डिचोलीतील रिक्षा, मोटारसायकल पायलट रस्त्यावर

व्यवसाय अडचणीत: डिचोलीत सुरक्षित जागेच्या मागणीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा

दैनिक गोमन्तक

डिचोली: शहरातील बसस्थानकावरील रिक्षा आणि मोटारसायकल पायलट सध्या रस्त्यावर आले असून या पायलटांसमोर जागेची गंभीर अडचण निर्माण झाली आहे. नवीन बसस्थानक प्रकल्प बांधण्यासाठी सध्याचे बसस्थानक बंद करण्यात आले असून या बसस्थानकावरील रिक्षा आणि मोटारसायकल पायलटांना बसस्थानकावरून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आधीच जागेच्या प्रतीक्षेत असलेल्या या पायलटांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या हे पायलट बसस्थानकाच्या प्रवेशद्वार परिसरात रस्त्यावर वणवण करून भाड्याच्या प्रतीक्षेत असतात. आम्हाला सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी पायलटांकडून होत आहे.

सध्या ज्याठिकाणी पायलट भाडेकरूंच्या प्रतीक्षेत असतात, ती जागा अत्यंत असुरक्षित आहे. बसस्थानकाला जोडून बाजारात जाणाऱ्या रस्त्यावरच या पायलटांना सध्या जागा देण्यात आली आहे. या रस्त्यावर वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे एखादेवेळी अपघाताची संभावना नाकारता येत नाही अशी भीती हे पायलट व्यक्त करीत आहेत.

रखरखत्या उन्हापासून सुटकारा मिळावा म्हणून आसऱ्यासाठी धड मोठी छत्रीही लावायला मिळत नाही. एखादे भाडे मिळाले आणि ते भाडे मारून येईपर्यंत पुन्हा जागा मिळत नाही. त्याठिकाणी अन्य वाहने पार्क केलेली आढळून येतात. अशी खंत पायलट व्यक्त करीत आहेत. आधीच ‘कोविड’ मुळे गेली दोन वर्षे आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. आता जागेचे संकट निर्माण झाले आहे. सोयीस्कर जागा नसल्याने आम्ही आता व्यवसाय कसा करावा. असा प्रश्न रिक्षा आणि मोटारसायकल पायलट व्यक्त करीत आहेत. बसस्थानकावरून बाहेर काढल्यापासून काहींनी तर बसस्थानक परिसरात येण्याचे बंद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हायरल व्हायरल

Akshat Naik Death Case: 'अक्षत' मृत्यूप्रकरणी नव्याने तपास करा, वडिलांची पोलिसांत तक्रार, पुरावे लपविल्याचा आरोप

Monsoon Tourism: सोशल मीडियासाठी रिल्स, सेल्फीचा नाद घेतो जीव! पावसाळी पर्यटनाचा मुद्दा बनला जटिल; धारबांदोड्यात 17 धोकादायक स्थळे

Karapur Sarvan Sarpanch: कारापूर-सर्वण सरपंच निवडीसाठी मंगळवारी बैठक, बिंदिया सावंत यांचे नाव निश्‍चित तरी उत्सुकता

SCROLL FOR NEXT