Richa Lavoo Govekar pilot IndiGo Dainik Gomantak
गोवा

Fathers Day: घे उंच भरारी! तिच्या स्वप्नांना वडिलांनी दिले पंख; साखळीची 'रिचा' झाली विमान पायलट

Richa Lavoo Govekar pilot story: कमर्शियल पायलट लायसन्स हा कोर्स करून आकाशात विमानाने झेपावणे, हे तिचे स्वप्न होते. या स्वप्नाला पंख दिले तिच्या वडिलांनी.

Sameer Panditrao

साखळी: आमचे साखळीत स्टेशनरी दुकान. पप्पा आणि मम्मी हे दुकान सांभाळतात. त्या बळावर माझ्या स्वप्नांना भरारी मिळेल का? हा प्रश्न मनात घोंघावत असतानाच पप्पांचे ‘उंच उंच भरारी घे रे माझ्या चिमण्या...’ हे उदगार आजही माझ्या मनात आहेत. पप्पांमुळेच मी स्वप्नांना गवसणी घालू शकले. हे विधान आहे इंडिगो कंपनीतील ‘फर्स्ट ऑफिसर’ रिचा लवू गोवेकरचे.

कमर्शियल पायलट लायसन्स हा कोर्स करून आकाशात विमानाने झेपावणे, हे तिचे स्वप्न होते. या स्वप्नाला पंख दिले तिच्या वडिलांनी. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने तिने आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या.

ती म्हणाली, मी विमान पायलट होण्याची इच्छा प्रकट केली, त्यावेळी पप्पा भक्कमपणे माझ्या मागे उभे राहिले. या कोर्ससाठी खूप पैसे लागणार, याची मला जाणीव होती. पण पप्पा म्हणाले, ‘तुला हा कोर्स करायचाय ना, तर चल तू त्याची चौकशी कर. बाकी काहीच विचार करायचा नाही. केवळ तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर.’ हे शब्द आजही मला आठवतात.

अन् पप्पा-मम्मीच्या आनंदाला उधाण

आपली लेक एकटीच परगावी राहणार, तिच्या जेवणाचे हाल, गोव्याचे जेवण आणि तिथले जेवण यात मोठा फरक. आपली मुलगी कशी एडजस्ट करेल, या विचारात पप्पा - मम्मी नेहमीच टेन्शनमध्ये असायचे. पण त्यांना मी धीर दिला. दीड वर्षाचा हा कोर्स; पण मध्येच कोविड महामारी व इतर तांत्रिक अडचणींमुळे कोर्सला थोडा विलंब झाला. पण कोर्स संपवून मी गोव्यात परतले, तेव्हा पप्पा आणि मम्मीच्या तोंडावरील आनंद, समाधान पाहून मी त्यांच्यासाठी संपूर्ण जगाचा आनंद सोबत आणल्याची अनुभूती मला आली.

अडथळ्यांची शर्यत; पण जिद्द कायम

बारामती येथे कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स करण्यासाठी प्रवेश मिळवला. त्यासाठी रवाना होणार, इतक्यातच पप्पांना हृदयविकाराचा झटका आला. हा काळ माझ्यासाठी अत्यंत नाजूक होता. पप्पांना बरे वाटल्यावर जेव्हा त्यांच्या कुशीत बसले, तेव्हा त्यांनी, ‘तू माझी चिंता करू नकोस, तुझ्या कोर्सवर फोकस कर, मी लवकरच बरा होईन’ असा मलाच धीर दिला. त्यांना मला पायलट झालेले पहायचे होते. त्यानंतर अवघ्याच दिवसांनी मी या कोर्ससाठी रवाना झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT