Ponda News Dainik Gomantak
गोवा

Ponda News: आरजीने बंद पाडली तळवलीतील डोंगर कापणी

डायनामाइट, अमोनिया आणि इतर स्फोटक साहित्य जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News तळावली येथे बेकायदेशीरपणे चाललेली डोंगर कापणी रिव्हॉल्युशनरी गोवन्सने बंद पाडलीय. या संदर्भात आरजीने तक्रार केल्यावर या डोंगर कापणी ठिकाणी छापा टाकण्यात आला.

दरम्यान या टाकलेल्या छाप्यात 650 डायनामाइट, 50 किलो अमोनिया, डिटोनेटर आणि इतर स्फोटक साहित्य सापडले असून ते सर्व साहित्य बॉम्बशोधक पथकाने जप्त केलेय.

या संबंधी बोलताना आरजीचे मनोज परब यांनी सांगितलं की, भाजप सरकारच्या काळात डोंगर कापणी सारखी पर्यावरणचा विध्वंस करणारी कामे खुलेआम सुरु आहेत. मुख्य म्हणजे यावर कुणाचाही अंकुश राहिला नाहीय.

आरजीने पर्यावरणाचा चाललेला हा विनाश उघड केला. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहोत.

दरम्यान मागील वर्षी मोरजी पंचायत क्षेत्रातील बेकायदा डोंगर कापणी प्रकरणी मंत्री विश्‍वजीत राणे यांनी गंभीर दखल घेऊन डोंगर कापणी त्वरित बंद करावी आणि संबंधित कंपनी आणि फार्म मालकावर गुन्हा नोंद करावा असा आदेश नगरनियोजन खात्याला दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT