Ribander Ferry point Dainik Gomantak
गोवा

Goa Ferry Boat: तिकीट दरवाढीविरोधात विविध फेरी पॉईंटवर RG च्यावतीने निदर्शने

फेरीबोटीतून वाहने नेण्यास लावलेल्या शुल्कावर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने आक्षेप घेतला आहे.

Pramod Yadav

Goa Ferry Boat Price Hike: फेरीबोटीतून वाहने नेण्यास लावलेल्या शुल्कावर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने आक्षेप घेतला आहे. विविध फेरी पॉईंटवर पक्षाच्या वतीने आज (शनिवार, दि.04) निदर्शने करण्यात आली.

Rachol ferry point

पक्षाच्या वतीने रायबंदर आणि राशोल फेरी पॉईंटवर निदर्शने करण्यात आली. रायबंदर फेरी पॉईंटवर पक्षाचे एकमेव आमदार विरेश बोरकर सहभागी झाले होते. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

'आम्ही तिकीट दरवाढीला विरोध करतो, दरवाढ रद्द करा,' असे बॅनर हातात घेऊन पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

नदी परिवहन खात्याने फेरी बोटमधून दुचाकींना तिकीट आकारणी करण्याची अधिसूचना जारी केली आहे तसेच, चारचाकींच्या तिकीट दरातही वाढ केली आहे.

दुचाकींसाठी प्रति फेरी १० रुपये आणि चारचाकीसाठी ४० रुपये भाडे प्रस्तावित आहे. दुचाकींसाठी १५० रुपये आणि चारचाकीसाठी ६०० रुपये मासिक पासचा पर्यायही प्रस्तावित आहे. या दरवाढीला राज्यभरातून विरोध होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT