Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : अमित शहांनी गोव्याला फक्त 15 मिनिटं दिली; म्हादईप्रश्नी मनोज परबांनी सरकारला घेरलं

केवळ 15 मिनिटात ही भेट आटोपती घेत केंद्राकडून गोव्यातील भाजप नेत्यांची बोळवण केल्याचा टोला मनोज परब यांनी लगावला आहे.

आदित्य जोशी

गोव्यात सध्या म्हादईचा प्रश्न पेटला आहे. विरोधकांनी सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. अशातच रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी गोवा सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. गोवा सरकारमधील मंत्र्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेले होते. मात्र केवळ 15 मिनिटात ही भेट आटोपती घेत केंद्राकडून गोव्यातील भाजप नेत्यांची बोळवण केल्याचा टोला मनोज परब यांनी लगावला आहे.

गोव्यात म्हादईवरील प्रकल्पामुळे जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हादई गोव्याची जीवनदायिनी असून केंद्राने कर्नाटकला फार पूर्वीपासून झुकतं माप दिलं आहे. गोव्यातील भाजपचं डबल इंजिन सरकार हे केंद्राला आपली बाजू समजावून देण्यात अपयशी ठरलं असून दिल्लीदरबारी झालेल्या भेटीत केवळ 15-20 मिनिटांमध्ये बैठक आवरत केंद्राने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डावललं असल्याचा निशाणा परबांनी साधला आहे.

अमित शहांनी नुकतंच गोवेकरांबद्दल एक वक्तव्य केलं होतं, की गोव्याची लोकं आंदोलन करणार नाहीत. केंद्र सरकारने गोवेकरांना गृहीत धरलं आहे की गोव्याची लोकं म्हादईवरील प्रकल्पाला विरोध करणार नाहीत. आणि यामुळेच कर्नाटकला झुकतं माप देण्याचं काम सरकारने केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण केंद्राला म्हादईप्रश्नी दिलेला डीपीआर मागे घेण्याची मागणी केली आहे. मात्र दिल्लीतील भेट झाल्यानंतर अजूनही हा डीपीआर मागे घेण्यात आलेला नाही. याचाच अर्थ केंद्राने गोव्याला आणि गोव्यातील भाजप सरकारला गृहीत धरलेलं आहे. हे जर होऊ नये असं वाटत असेल तर आता गोवेकरांनी एकत्र येऊन केंद्रातील भाजप सरकारला आपली ताकद दाखवण्याची गरज आहे. रिव्हॉल्युशनरी गोवन्सने एक लोकचळवळ उभी केली आहे, ती आता पुढे नेण्यासाठी लोकांनी पुढे यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

SCROLL FOR NEXT