Dainik Gomantak
गोवा

Education Loan: जीईडीसीची सुधारित व्याजमुक्त कर्ज योजना

Education Loan: पालकांच्या उत्पन्न मर्यादेत 12 लाख व 20 लाखांपर्यंत वाढ

दैनिक गोमन्तक

Education Loan: गोवा शिक्षण विकास महामंडळाची (जीईडीसी) सुधारित व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजना जाहीर करून त्याची अधिसूचना काढली आहे. देशातील व परदेशातील व्यावसायिक शिक्षणासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा अनुक्रमे 12 लाख व 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या सुधारीत योजनेसाठी येत्या 27 नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष 2023 - 24 साठी अर्ज स्वीकारले जाणार असून 29 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर यांनी दिली.

या सुधारीत योजनेनुसार विदेशातील व्यावसायिक शिक्षणासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा 7 लाखावरून 12 ला,ख तर विदेशातील शिक्षणासाठी 12 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या महामागाईमुळे ही मर्यादा वाढवण्याच्या निर्णयाला सरकारने मान्यता दिल्याने हे शक्य झाले.

देशातील अभ्यासक्रमासाठी दरवर्षी 2 लाख रुपयांप्रमाणे 5 वर्षे मिळून 10 लाख रुपये, तर विदेशातील अभ्यासक्रमासाठी दरवर्षी 8 लाखप्रमाणे दोन वर्षे 16 लाख रुपये कर्ज दिले जाणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षाने या व्याजमुक्त कर्जाची परतफेड उमेदवाराला करायची आहे. या परतफेडीमध्ये विलंब झाल्यास 10 टक्के दराने त्या कर्जाच्या रक्कमेवर दंड म्हणून व्याज आकारण्यात येणार आहे असे पर्वतकर यांनी सांगितले.

आत्तापर्यंत 9733 विद्यार्थ्यांना लाभ

व्याजमुक्त शिक्षण कर्ज योजना 2003 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कोणत्याही विद्यार्थ्याला पैशांअभावी शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये या उद्देशाने सुरू केली होती. त्यानंतर 2005 साली ही योजना गोवा शिक्षण विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली होती. आत्तापर्यंत या योजनेमार्फत 9733 गोमंतकीय विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT