Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: आपत्ती व्यवस्थापनासाठी निधीच नाही; महसूलमंत्री ‌मोन्सेरात

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: आमदार संकल्प आमोणकर यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून देण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाला नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून देण्यासाठी आणि आपत्ती येऊ नये, यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

त्याला उत्तर देताना महसूलमंत्री ‌बाबूश मोन्सेरात यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगळा निधी सरकारकडून दिला जात नसल्याची कबुली दिली. ते म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा अशी खाती आहेत. त्या खात्यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा काम करवून घेते.

घर पडलेल्यांना दोन लाखांची मदत

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी, राज्यभरात पावसामुळे पडझड झालेली नुकसानग्रस्त सर्वच घरे सरकार बांधून देणार का, अशी विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, अटल आसरा योजनेंअतर्गत दोन लाख रुपयांची मदत प्रत्येक नुकसानग्रस्त घराला देऊ, अशी घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Hypoglycemia: काय आहे हाइपोग्लायसेमिया? रक्तातील साखर अचानक कमी होणं ठरु शकतं जीवघेणं; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

Viral Video: बंगळूरुतील अजब प्रकार! भररस्त्यात गादी टाकून झोपला तरुण; वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

राशीनुसार रंग परिधान केल्यानं होईल फायदा, देवी करेल मनोकामना पूर्ण; तुमचा Lucky Colour कोणता? वाचा

SCROLL FOR NEXT