Babush Monserrat Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrat: बाबूश यांना आजारातही 'स्मार्ट सिटी'च्या कामांचीच काळजी; आज डिस्चार्जची शक्यता

Babush Monserrat: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना उद्या बुधवारी गोमेकॉ इस्पितळातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Babush Monserrat: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना उद्या बुधवारी गोमेकॉ इस्पितळातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर त्याच दिवशी मध्यरात्री कार्डिओलॉजिस्ट डॉ. अमर प्रभुदेसाई यांनी अँजिओप्लास्टी शस्रक्रिया केली.

आजारातही बाबूश यांना 'स्मार्ट सिटी' कामांची काळजी

अँजिओप्लास्टि झाल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखाली गोमेकॉत विश्रांती घेत असलेले मंत्री बाबूश यांना 'स्मार्ट सिटी' च्या कामांची काळजी दिसून आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी महानगरपालिका अधिकारी मंत्री बाबूश यांना विचारपूस करण्यासाठी गेले होते. परंतु यावेळी बाबूश यांनी त्यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या कामांची विचारणा केली.

दोन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. डॉ. प्रभुदेसाई यांनी केलेली शस्रक्रिया यशस्वी झाल्याने त्यांच्यावर पुढील उपचारांची गरज वाटत नाही. दरम्यान, गोमेकॉतील वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्री मोन्सेरात यांची प्रकृती स्थिर असून उद्या बुधवारी त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो.

महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार आतानासियो (बाबूश) मोन्सेरात यांच्यावर रविवारी मध्यरात्री अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तत्काळ गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले होते. शस्रक्रिया झाल्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आले आहे.

मंत्री बाबूश यांच्यावर शस्रक्रिया झाल्याचे वृत्त सकाळी ‘गोमन्तक टीव्ही’वर सर्वात प्रथम देण्यात आले. आमदार मोन्सेरात यांच्यावर शस्रक्रिया झाल्याचे वृत्त समजताच त्यांचे कार्यकर्ते, नगरसेवकांनी गोमेकॉकडे धाव घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT