Goa Government Job Scam  Dainik Gomantak
गोवा

'Cash For Job Scam'चे आणखी एक प्रकरण उघड! निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाकडून 6 लाख उकळले

Cash for Job Scam New Case involving Navy Veteran son: पैसे घेऊन नोकरी देण्याचे प्रकरण सध्या राज्यात गाजत असताना तिसवाडीत आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाला नोकरी देण्याचे आमिष दाखवून ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tiswadi Cash For Job Scam

तिसवाडी: पैसे घेऊन नोकरी देण्याचे प्रकरण सध्या राज्यात गाजत असताना तिसवाडीत आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाला अबकारी खात्यात उपनिरीक्षकपदी नोकरी देण्याचे आमिष दाखवून ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सतीश मोरे याच्यासह सरिता केरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेरशी येथे राहणाऱ्या एका महिलेने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल होती. आपल्या मुलाला अबकारी खात्यात उपनिरीक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून संशयित शिवा मोरे आणि सरिता केरकर या दोघांनी मार्च २०२३ ते १४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ६ लाख रुपये घेतले होते, तसेच संशयितांनी अबकारी खात्याचे अधिकारी संकेत साखरदांडे यांच्या नावे बनावट दस्तावेज तयार केला होता, असे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अजूनही अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

तुमचा मुलगा अंतिम यादी समाविष्ट असल्याचे भासवून संशयितांनी दस्तावेज महिलेला दिले होते. आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर तिने जुने गोवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, दोन्ही संशयितांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT