Wall Collapses At Margao, Viriato fernandes  Dainik Gomantak
गोवा

Margao News: लोकनिधीतून उभे राहणार विमल शिरोडकर यांचे घर; जागरूक नागरिकांचा पुढाकार

Wall Collapses At Margao: खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सावियो कुतिन्‍हो व सावियो डिसिल्‍वा यांच्‍यासमवेत शिरोडकर यांच्‍या घराला भेट देऊन पाहणी केली

गोमन्तक डिजिटल टीम

मडगावातील लोकप्रिय अशा निवृत्त होमगार्ड विमल शिरोडकर यांच्‍या घराची भिंत पावसामुळे मोडून पडल्‍याने त्‍या बेघर झाल्‍या आहेत. अशा परिस्‍थितीत काही जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन लोकांकडून निधी उभारून त्‍यां‍च्‍या घराची भिंत पुन्‍हा उभारून देण्‍याचा संकल्‍प केला असल्‍याची माहिती मडगावचे माजी नगराध्‍यक्ष सावियो कुतिन्‍हो यांनी दिली.

काल रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती. विमल शिरोडकर या बिस्किटे विकत घेण्‍यासाठी दुकानात गेली असता, ही दुर्घटना घडली. त्‍यामुळे त्‍या सुदैवाने बचावल्‍या. त्‍यानंतर त्‍या भागातील स्‍थानिकांनी त्‍यांना तात्‍पुरती मदतही केली.

आज दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सावियो कुतिन्‍हो व सावियो डिसिल्‍वा यांच्‍यासमवेत शिरोडकर यांच्‍या घराला भेट देऊन पाहणी केली. शिरोडकर यांना सरकारी फंडातून मदत मिळावी यासाठी त्‍यांच्‍या घराची तलाठ्याद्वारे पाहणी करून यासंबंधीच्‍या नुकसानीचा अहवाल मामलेदारांना सादर केला आहे.

मात्र सरकारी मदतीवरच अवलंबून न राहता लोकांकडून निधी गोळा करून विमल शिरोडकर यांच्‍या घराची दुरुस्‍ती करण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला आहे. विशेष म्‍हणजे लोकांनी मदत देणेही सुरू केले आहे, असे कुतिन्‍हो यांनी सांगितले. लवकरच घराचे काम हाती घेण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सावियो कुतिन्‍हो, समाजकार्यकर्ते

विमल शिरोडकर यांनी एक प्रामाणिक गृहरक्षक म्‍हणून कर्तव्‍य बजावले आहे. मडगावातील वाहतुकीला नीट व व्‍यवस्‍थित वळण लागावे यासाठी त्‍यांनी केलेले कार्य कौतुकास्‍पद आहे. मडगावकरांसाठी त्‍यांनी जी सेवा दिली आहे, त्‍याची परतफेड म्‍हणून आता मडगावकरांनी त्‍यांना या संकटकाळात मदत करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT