Now onwards municipal corporation will have full authority over market in Panaji
Now onwards municipal corporation will have full authority over market in Panaji Dainik Gomantak
गोवा

पणजी महापालिकेच्या दोन नगरसेवकांचा निकाल अडला

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी महापालिकेत नामनिर्देशीत नगरसेवक म्हणून घेतलेल्या कबीर माखिजा आणि किशोर शास्त्री यांच्या नियुक्तीला आव्हान दिलेल्या ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांच्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

(result of two corporators of Panaji Municipal Corporation was blocked)

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्या. एम. एस. सोनक आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे ॲड. आयरिश यांच्या याचिकेवरील युक्तिवाद मंगळवारी संपला. गेल्या आठवड्यापासून या प्रकरणावर युक्तीवाद सुरू होता. अ‍ॅड. आयरिश यांनी आपल्या याचिकेत कबीर माखिजा आणि किशोर शास्त्री यांची नामनिर्देशीत नगरसेवक म्हणून नियुक्ती करणे हे संपूर्णपणे कायद्याचे उल्लंघन आहे. त्याशिवाय त्या दोघांनाही महापालिका प्रशासनातील आवश्यक विशेष ज्ञान आणि अनुभव नसतानाही त्यांची नियुक्ती केली आहे.

किशोर शास्त्री यांनी त्यांच्या बायोडाटामध्ये एकवेळा नगरपालिकेच्या नगरसेवकाशिवाय, शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल्समध्ये आयटीआय अशी नमूद केले आहे, तर कबीर माखिजा यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा व्यतिरिक्त, तो एक खेळाडू होता आणि विविध कार्यक्रमांमध्ये मॉडेलिंग केले होते. शिवाय त्यानेही एकवेळ नगरसेवकपद भूषविले आहे. महापालिका कायद्याच्या कलम ९ (१) (बी) च्या वैधतेला ॲड. आयरिश यांनी आव्हान दिले आहे. ज्यामध्ये महापालिका प्रशासन, अभियांत्रिकी, वास्तुकला, पुरातत्व, वारसा इत्यादी विषयांचे विशेष ज्ञान किंवा अनुभव असलेल्या पाच नगरसेवकांना नामनिर्देशित करण्याची तरतूद आहे. ती तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३-आर चे उल्लंघन करणारी आहे, असे ॲड. आयरिश यांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT