Chavadi Udyan in Canacona Dainik Gomantak
गोवा

काणकोण पालिकेचे चावडीतील उद्यान खुले करण्याचे प्रयत्न

हॉटेलचे अधिकारी उद्यानाच्या पाहणीसाठी येणार असल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

काणकोण : काणकोण पालिकेचे चावडी येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले उद्यान दोन वर्षानी खुले करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे उद्यान बंदच होते. मध्यंतरी या उद्यानातील मोठ्या झाडांची छाटणी करण्यात आली. उद्यानात सध्या गवत वाढले असून उद्यानातील झोपाळे, घसरगुंडी आणि खेळण्याचे अन्य साहित्य गंजून गेले आहे. पोर्तुगीजकालीन हे उद्यान पालिकेचे भूषण आहे. (Chavadi Udyan in Canacona News Updates)

गोवा मुक्तीनंतर काणकोणमधील (Canacona) या उद्यानात ध्वनीक्षेपकाची व्यवस्था होती. सकाळ-संध्याकाळी या उद्यानातून आकाशवाणी वरील बातम्या आणि संगीताचे प्रसारण करण्यात येत होते. मात्र, काळाच्या ओघात ते बंद झाले पालिकेने दरवर्षी या उद्यानाच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च केले. राजबाग येथे असलेल्या द ललित पंचतारांकित हॉटेलने काही वर्षांपूर्वी या उद्यानात रोषणाई केली. मात्र, पाच वर्षापासून हॉटेल (Hotel) व्यवस्थापनाने देखभालीसबंधीची आपली भूमिका बदलली आहे.

सीएसआर उपक्रमांतर्गत पाळोळे येथील सरोवर आस्थापनाकडून उद्यानाचा विकासाचा प्रस्ताव आहे. आज बुधवारी या हॉटेलचे अधिकारी उद्यानाच्या पाहणीसाठी येणार आहेत. त्यासाठी उद्यानाची स्वच्छता करण्यात आली. हॉटेल व्यवस्थापनाने सीएसआरअंतर्गत उद्यान दत्तक घेतल्यास पालिकेला आनंद आहे. अन्यथा सुडातून उद्यानाचा विकास (Development) करण्याचा पर्याय पालिकेकडे असल्याचे नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT