Panjim News Dainik Gomantak
गोवा

Panjim News: महिला विशेष हिंदी कार्यशाळेला प्रतिसाद

महिला सबलीकरण या घटकअंतर्गत ज्योसलीन डिसोझा व रूथ डिसोझा यांना गौरविण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या विभागीय गोवा कार्यालयातर्फे शुक्रवारी (ता. 10) महिला विशेष हिंदी कार्यशाळा आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम पार पडला. यात बँकेच्या शाखा आणि कार्यालयातील 27 महिलांनी सहभाग घेतला.

प्रारंभी बँकेचे विभागीय उपप्रमुख अजय कुमार यांनी महिलांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. कार्यशाळेचे उद्‌घाटन बँकेचे विभाग प्रमुख अशोक उपाध्याय यांनी केले. ‘आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये प्रभावी कामगिरी करत असून आमच्या बँकेच्या चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक ही पदे सध्या महिला भूषवित आहेत’, असे ते म्हणाले.

यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आले. बँकेच्या टोंक शाखेच्या एडिथ परेरा यांनी आभार मानले. या कार्यशाळेबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले.

विविध विषयांवर मार्गदर्शन

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक नीता मेघनानी यांनी महिलांचे हक्क आणि शिक्षण तर ब्रह्मकुमारीच्या संगीता बहन यांनी महिलांनी शांतपणे कशी कामे करावीत यावर मार्गदर्शन केले. महिला सबलीकरण याखाली ज्योसलीन डिसोझा व रूथ डिसोझा यांना गौरविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT