Free Education Scheme Dainik Gomantak 
गोवा

गोव्यात मोफत शिक्षण योजनेला मिळेना प्रतिसाद

‘कोविड’ संकटाने ज्या मुलांचे पालक हिरावून घेतले त्यांना केंद्रीय विद्यालयात फुकट शिक्षण देण्याची योजना

दैनिक गोमन्तक

मडगाव: ‘कोविड’ संकटाने ज्या मुलांचे पालक हिरावून घेतले त्यांना केंद्रीय विद्यालयात फुकट शिक्षण देण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली असली तरी गोव्यात या योजनेचा फायदा घेण्यासाठी एकाही विद्यार्थ्याचा अर्ज आलेला नाही, अशी माहिती शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी दिली.

ही योजना जरी केंद्र सरकारची असली तरी राज्याचे शिक्षण संचालनालय ही योजना राबविण्यासाठी समन्वयकाची भूमिका निभावत आहे. अजून तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकही अर्ज आलेला नाही असे सावईकर यांनी सांगितले.

कोविडमुळे ज्या मुलांचे पालक दगावले अशा मुलांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा (पीएम्स केअर) योजनेखाली सुविधा मिळवून देण्याची केंद्र सरकारची योजना असून या योजनेखाली नोंद झालेल्या विद्यार्थ्यांना ही मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

गोव्यात एकूण 6 केंद्रीय विद्यालये असून या योजनेखाली राज्यात कमाल 60 विद्यार्थ्यांची मोफत शिक्षणाची सोय होऊ शकते. मात्र अजून या योजनेचा फायदा घेण्यासाठी एकही विद्यार्थी पुढे आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT