Dainik Gomantak News Paper Dainik Gomantak
गोवा

Goa Budget 2023 : विधानसभेत ‘गोमन्तक’च्या अभिनंदनाचा ठराव

सभापतींकडून गौरवोद्गार :अविरत, निर्भीड आणि निष्पक्ष सेवेची ६१ वर्षे पूर्ण

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यातील पहिले मराठी दैनिक म्हणून गौरविलेल्या ‘गोमन्तक’ने अविरत, निर्भीड आणि निष्पक्ष सेवेची 61 वर्षे पूर्ण केली, यासाठी शुक्रवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘गोमन्तक’च्या अभिनंदनाचा विशेष ठराव मंजूर करण्यात आला.

सभापती रमेश तवडकर यांनी या ठरावाची घोषणा केली. त्‍यानंतर विधानसभा सदस्यांनी अभिनंदन ठरावाला मंजुरी दिली. 24 मार्च 1962 रोजी उदयास आलेल्या ‘गोमन्‍तक’ने पत्रकारितेच्‍या माध्‍यमातून सामाजिक पातळीवर भरीव योगदान दिले आहे.

हे दैनिक वाचकांच्या जीवनाशी, विचारांशी, ध्येयवादाशी त्यांच्या सामान्य गरजा, त्यांचे प्रश्न अन्याय, अभिमान, आनंद आणि दुःख अशा वेगवेगळ्या प्रसंगांशी समरस झालेले आहे.

पत्रकारितेवर अनेक मर्यादा येत असूनही ‘गोमन्‍तक’ने तत्त्वांशी तडजोड न करता समाजोन्‍नतीचे कार्य वृद्धिंगत केले. विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर झाल्‍यानंतर अनेकांनी विविध माध्‍यमांद्वारे ‘गोमन्‍तक’ला शुभेच्‍छा दिल्‍या.

बा. द. सातोस्‍कर, माधव गडकरी, नारायण आठवले, दत्ता सराफ अशा दिग्‍गज संपादकांचा संपन्‍न वारसा आज समर्थपणे पुढे नेला जात आहे. मराठी अकादमीच्‍या निर्मितीसाठी दिलेले योगदान, केपे येथील दृष्टिहीन कुटुंबीयांना घराची सुविधा, लातूर भूकंपावेळी भरीव मदत अशी अनेक सामाजिक कार्याची उदाहरणे आहेत. अभिनंदन ठरावामुळे गोमंतकीयांप्रति असलेल्या उत्तरदायित्वाची जबाबदारी अधिक वाढली आहे.

‘गोमन्‍तक’ हे केवळ दैनिक नसून ती चळवळ आहे. मुक्‍त गोव्‍यातील नागरी उत्‍थानात ‘गोमन्‍तक’चे योगदान उल्‍लेखनीय आहे. समाजातील अनेक घटकांना मदतीचा हात देऊन या वृत्तपत्राने माध्‍यमांमध्‍ये आपला स्‍वतंत्र ठसा उमटवला आहे. देदीप्‍यमान कार्याची विधानसभेने दखल घेतल्‍याचा आनंद होत आहे.

- जयंत संभाजी, ‘गोमन्‍तक’चे माजी कार्यकारी संपादक

‘गोमन्‍तक’मुळे गोव्‍यात पत्रकारितेचे महत्त्‍व अधोरेखित झाले, अनेक पत्रकार घडले. तळागाळातील लोकांचा आवाज बनून या दैनिकाने भरीव कार्य केले आहे. सरकारने घेतलेली दखल बळ देणारी ठरावी. दैनिकाकडून यापुढेही अधिकाधिक भरीव कार्य घडो.

- प्रकाश कामत, ज्‍येष्‍ठ पत्रकार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT