Mhaus Gram Sabha
Mhaus Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Issue : म्हाऊस ग्रामसभेत म्हादईविषयी ठराव संमत

दैनिक गोमन्तक

पर्ये मतदारसंघातील म्हाऊस पंचायतीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. केरी, गुळेली पंचायतीपाठोपाठ आज म्हाऊस पंचायतीतही म्हादई नदी वाचवण्यासाठी ठराव मांडून तो सर्वानुमते संमत करण्यात आला.

राजेश सावंत, गौरेश सावंत, सपना सामंत, संजय सावंत व इतरांनी म्हादईविषयी ठराव मांडला. सरकारच्या लढ्याला ग्रामस्थांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. त्यावर सरपंच सोमनाथ काळे, पंच व ग्रामस्थांनी सहमती दर्शवून ठराव मंजूर केला.

सुरुवातीला कोणत्याही पंच सदस्यांच्या कुटुंबीयांनी पंचायत कारभारात हस्तक्षेप करू नये, यावर चर्चा झाली. कोपार्डेतील संजय सावंत यांनी जलसिंचन खात्यातर्फे नवीन प्रकल्प साकारावा, असे सांगितले. म्हाऊस पंचायत क्षेत्रात नवीन उम्मीद केंद्रासाठी जागा सुचविण्याचे ठरले.

म्हाऊस येथील स्वयंमित्र श्याम सावंत यांना उत्कृष्ट स्वयंमित्र पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. ग्रामसभेस सरपंच सोमनाथ काळे, सचिव संदीप हरियाळी, उपसरपंच राधिका सावंत, सयाजी सावंत, गुरुदास गावस, सुलभा देसाई व इतर पंच उपस्थित होते. स्वागत सोमनाथ काळे यांनी केले तर आभार संदीप हरियाळी यांनी मानले.

लादी बसवण्याच्या कामात घोळ

राजेश सावंत यांनी, गेल्या पाच वर्षांत कोपार्डे गावात किती विकास झाला, याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली. गेल्या वर्षी कोपार्डेत डेंग्यूचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे यंदा तो पसरू नये यासाठी कोणती उपाययोजना केली, तसेच गावातील उघड्या गटारांवर लादी बसविण्यावरही चर्चा झाली. काही ठिकाणी टेंडर काढून परस्पर, नको त्या ठिकाणी लादी बसविली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पैशांचा घोळ झाल्याचे सांगण्यात आले. या विषयावर गरमागरम चर्चा झाली.

कोपार्डेत लम्पी रोगाचा प्रादुर्भाव

कोपार्डे व इतर ठिकाणी रस्त्यावर मोकाट गुरे ठाण मांडून बसतात. त्यातील काही गुरे जखमी अवस्थेत फिरतात. त्यांच्यामुळे इतर गुरांमध्ये लम्पी रोग पसरत आहे. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी सर्व पंच सदस्यांनी पुढाकार घ्यावा. जनजागृती करूनही पुन्हा अशी गुरे रस्त्यावर फिरताना दिसली तर ती गोशाळेत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यावर ठराव मांडून तो सर्वानुमते संमत करण्यात आला.

भाडेकरूंच्या माहितीसाठी ॲप

म्हाऊस पंचायत क्षेत्रातील काही घरांमध्ये भाडेकरू ठेवले आहेत. त्यांची सविस्तर माहिती पंचायतीला आहे का, या स्थानिकांच्या प्रश्नावर पंचायत सचिवांनी सांगितले की, पंचायत पातळीवर लवकर एक ॲप तयार करण्यात येणार आहे. या ॲपवर गावातील सर्व रहिवाशांची सविस्तर माहिती नमूद केली जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT