Goa Mining Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: काळोखात खनिज वाहतूक नकोच! पिळगाववासीयांचा पवित्रा; खाण खात्‍यासमोर पुन्‍हा पेचप्रसंग

Pilgao Mining Transport Issue: वेदान्‍ता कंपनीच्या खनिजप्रश्‍‍नी निर्माण झालेला गुंता सुटणार असे वाटत असतानाच आता पुन्हा ‘विघ्न’ उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sameer Panditrao

Pilgao Locals Against Vedanta Mineral Transport At Night

डिचोली: येथील वेदान्‍ता कंपनीच्या खनिजप्रश्‍‍नी निर्माण झालेला गुंता सुटणार असे वाटत असतानाच आता पुन्हा ‘विघ्न’ उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काळोखात खनिज वाहतूक नकोच, असा पवित्रा पिळगावच्या जनतेने घेतला असून रात्री दहा वाजेपर्यंत वेळ वाढविण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

‘ईसी’त नमूद केल्याप्रमाणेच खनिज वाहतूक करा, असे पिळगाववासीयांचे म्हणणे आहे. खाण खात्याने खनिज वाहतुकीसाठी वेळ वाढवून देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली तर पुढील परिणामांना खाण खाते जबाबदार असेल, असा इशारा त्‍यांनी दिला आहे.

ट्रकमालकांचा प्रस्ताव अमान्य

खनिज वाहतूकप्रश्‍‍नी तोडगा काढण्यासाठी काल सोमवारी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या उपस्थितीत डिचोलीत बैठक झाली. तीत खनिज वाहतुकीसाठी वेळ आणि ट्रिप संख्या वाढवून द्यावी, असा प्रस्ताव ट्रकमालक संघटनेतर्फे ठेवण्यात आला. पहाटे ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतुकीस व ताशी किमान ११० ट्रिप मारण्यास मुभा द्यावी, अशी त्‍यांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कला अकादमी कंत्राटदाराची आत्महत्या; 45 लाखांच्या थकबाकीवरून कंपनीच्या दोघांविरोधात गुन्हा

Mandar Surlkar Murder Case: सुर्लकर खून प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव; दोषींच्या मुदतपूर्व सुटकेला राज्य सरकारचा विरोध

Diabetes Risk: साखर सोडली तरी डायबिटीसचा धोका कायम! 'शुगर फ्री' खाणाऱ्यांमध्ये मधुमेहाचा धोका 31 टक्के जास्त; संशोधनातून धक्कादायक खुलासा

खरी कुजबुज: काँग्रेसला जडला 'एसएमएस' रोग!

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमिओ लेन' प्रकरणात लुथरा बंधूंना हायकोर्टाचा दणका; जामीन रद्द, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचा आदेश

SCROLL FOR NEXT