Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: मांगोरवासीयांना मिळणार नौदल परिसरातून रस्‍ता

Goa News: 42 वर्षांची मागणी : साळकर यांची मध्‍यस्‍थी

दैनिक गोमन्तक

Goa News: मांगोर-वास्को येथील रहिवाशांसाठी नौदल परिसरातून रस्ता उपलब्ध करून देण्याच्या 42 वर्षे जुन्‍या समस्येचे आमदार कृष्णा साळकर यांच्या शिष्टाईने अखेर निराकरण करण्यात आले. त्‍यांनी नौदल आणि राज्य प्रशासनासोबत संयुक्त बैठक बोलावून क्षेत्राची संयुक्त पाहणी केल्यानंतर सामंजस्य कराराद्वारे हा प्रश्न सोडविला.

दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली, नौदल अधिकारी आणि रहिवाशांसह त्‍यांनी पाहणी केली.

पत्रकारांशी बोलताना साळकर म्हणाले, मांगोर येथील अनेक घरांच्या सुधारणेसाठी राज्य सरकारकडून नौदल परिसरातून एक रस्ता लवकरच बांधला जाईल. जवळ बरीच घरं आहेत. अयप्पा मंदिर आणि एक निवासी इमारत आहे, जिथे बरेच लोक राहतात. परंतु त्यांना नेव्हल क्षेत्रातून महामार्गावर प्रवेश करण्याची समस्या भेडसावत होती.

तसेच गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न सुरू होता आणि दोन्ही पक्षांची बाजू न्यायालयात गेल्याने त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यांची बाजू आणि खटला बराच काळ रेंगाळत होता, असे साळकर म्हणाले.

आम्ही एक उपाय शोधून काढला आहे जिथे आम्ही सरकारसोबत सामंजस्य करार करू, ज्यामध्ये स्थानिकांना रस्त्याच्या रूपात प्रवेश मिळेल आणि नौदल आम्हाला रस्त्यासाठी आवश्यक असलेली जमीन देईल. आम्ही नौदलाला सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन ठेवण्याची विनंती करण्यात यशस्वी झालो आहोत. तेथे रस्ता अतिशय अरुंद आहे. या दोन्ही प्रमुख समस्यांचे निराकरण झाल्याने नौदल आणि नागरिक यांच्यात मित्रत्वाचे संबंध निर्माण होतील, असे साळकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT