Bicholim Flood  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Flood: डिचोलीत का आला पूर? स्थानिकांनी खाण खंदकांबाबत केला मोठा दावा

Goa Mine Dispute: मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने डिचोली शहरासह पाणी बाजारात घुसले आणि शहर जलमय झाले असा जनतेचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, ता. ३ (प्रतिनिधी) : पावसाच्या तडाख्यावेळी लामगावच्या माथ्यावरील खाण खंदकातून पाणी बाहेर सोडल्यामुळेच डिचोलीत पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती, असा दावा शहरातील नागरिक आणि दुकानदारांनी केला आहे.

गेल्या गुरुवारी (ता.१) पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. डिचोली शहरासह बाजाराला पुराने वेढा घातला होता. मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे वाटत असले, तरी जोरदार पावसावेळी खाण खंदकातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर सोडल्याने डिचोली शहरासह पाणी बाजारात घुसले आणि शहर जलमय झाले, असा जनतेचा दावा आहे.

पंधरा दिवसांपूर्वीही डिचोलीला पुराने वेढा दिला होता. त्यावेळीही लामगावच्या माथ्यावरील खाण खंदकातून पाणी बाहेर सोडल्यामुळेच डिचोली शहर पुराच्या वेढ्यात अडकले होते.

पावसाच्या तडाख्याबरोबर खाण खंदकातून पाणी बाहेर सोडताच लामगाव परिसरात जलमय स्थिती निर्माण झाली. लामगावहून डिचोली नदीला जोडलेला नाला तुडुंब भरून, छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळील ‘आर्का’तून पाणी बाहेर फुटले आणि हळूहळू शहरात तसेच बाजारात पाणी घुसले, असा जनता आणि व्यापाऱ्यांचा दावा आहे.

२५ वर्षांपूर्वी डिचोलीला पुराचा तडाखा बसला होता. त्यानंतर शहरासह बाजारात पाणी भरले नव्हते. सायंकाळी पावसाचा जोर कमी होताच आणि खाण खंदकातून पाणी बाहेर सोडणे बंद करताच पाणी ओसरले आणि पुराचा धोका टळला.

खाण खंदक तुडुंब

लामगावच्या माथ्यावरील खाण खंदक तुडुंब भरले आहे. हे खाण खंदक असुरक्षित बनले असून भोवतालच्या मातीचा भराव कोसळल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात न आल्याने पावसाचा जोर वाढत गेला आणि अशा स्थितीत पाणी बाहेर सोडले, तर मोठी आपत्ती कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. तीन अश्वशक्तीचे पंप बसवून या खाण खंदकातून पाणी लामगावच्या नाल्यात सोडण्यात येत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पुराचा वेढा

गेल्या गुरुवारीप्रमाणेच पंधरा दिवसांपूर्वी पाण्याच्या जोर वाढल्याने शहरातील नदीने धोक्याची पातळी पार केली होती. पाणी बाहेर फुटून शहरातील विविध भागात घुसले होते. बाजारातही पाणी घुसले होते. शहराला पुराने वेढा दिला होता. शहरातील जनता आणि व्यापाऱ्यांची त्यावेळी धांदल उडाली होती. मात्र, रात्री पाणी ओसरल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT