Goa ST Reservation | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: एसटीना फक्त भाजप राजवटीतच न्याय, राजकीय आरक्षण आनंदाची बाब - अँथनी बार्बोजा

आरक्षणाची घोषणा गोव्यातील तमाम एसटी बांधवांसाठी आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी दिली.

सुशांत कुंकळयेकर

ST Reservation: 2027 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज (शनिवारी) विधानसभा अधिवेशनात घोषणा केली.

आरक्षणाची घोषणा गोव्यातील तमाम एसटी बांधवांसाठी आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी दिली.

गोव्यात आतापर्यंत एसटीना फक्त भाजप राजवटीतच न्याय मिळाला आहे. केंद्रात भाजप सरकार असताना पहिल्यांदा वाजपेयी सरकारने गोव्यातील गावडा, कुणबी व वेळीप या तीन समाजाना एसटी दर्जा प्राप्त झाला.

गोव्यात भाजप सरकारात आदिवासीं कल्याण खत्याचे मंत्री असताना रमेश तवडकर यांनी एसटीसाठी तमाम योजना लागू केल्या आणि या समाजाला राजकीय आरक्षणही भाजपचेच डबल इंजिन सरकार मिळवून देईल असा विश्वास बार्बोजा यांनी व्यक्त केला.

बार्बोजा म्हणले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेही एसटीना त्यांचा योग्य मान देण्यासाठी वावरत आहेत. त्यांच्यामुळेच द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला भारताच्या राष्ट्रपती होऊ शकल्या.

भाजप सरकार हे वंचितांना पूढे आणणारे सरकार आहे त्यामूळे गोव्यातील सर्व एसटी बांधवांनी भाजपवर पूर्ण विश्वास ठेवण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT