Goa Flood  Dainik Gomantak
गोवा

Goa Flood: विद्यार्थ्यांची होडीतून सुटका! गावांचा संपर्क तुटला

Goa Rain: अग्निशामक दल तसेच आपत्ती निवारण विभागातर्फे होडीची तरतूद करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: संततधार पावसामुळे फोंडा तसेच धारबांदोडा तालुक्यात मोठी पडझड झाली. तिराळ-उसगाव येथे तर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने लोकांचा गावाशी असलेला संपर्क तुटला, अखेर होडीतून विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना त्यांच्या घरी सुखरूप पोचवण्यात आले.

संततधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. नदी नाले तुडुंब भरून वाहताना दिसले तर शेती जलमय झाली होती. फोंडा तसेच धारबांदोडा तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. अग्निशामक दल तसेच स्थानिकांनी ही झाडे हटविली.

तळावली भागात एक संरक्षक भिंत कोसळली. खांडेपार तसेच बेतोडा भागात मोठी पडझड झाली असून तिराळ - उसगाव येथील मेडितेंबी भागात रस्त्यावरून पाणी आरपार झाल्याने गावाचा संपर्क तुटला.

सकाळी शाळा, विद्यालयात गेलेली मुले तसेच ग्रामस्थ अडकून पडल्यानंतर अग्निशामक दल तसेच आपत्ती निवारण विभागातर्फे होडीची तरतूद करण्यात आली व पंधरा विद्यार्थी तसेच इतर ग्रामस्थांना या होडीतून सुखरूप घरी पोचवण्यात आले.

स्थानिक पंचसदस्य राजेंद्र नाईक यांनी यावेळी लोकांच्या सुरक्षेसाठी मोठे प्रयत्न केले. अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांनी दलाच्या जवानांसह या कामी मोठा सहयोग दिला.

उसगाव पंचायत मंडळाशी अधिकाऱ्यांची चर्चा

मुर्डी - खांडेपार येथेही पूरस्थिती निर्माण झाली होती. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी आश्‍विन चंद्रू यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर, फोंड्याचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, फोंडा मामलेदार भिकू गावस, फोंडा अग्निशामक दलाचे प्रमुख अजित कामत, जलस्रोत खात्याचे तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुर्डी - खांडेपार तसेच उसगाव भागाला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. यावेळी उसगाव पंचमंडळासोबत बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत सूचनाही केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

SCROLL FOR NEXT