Request to issue summons to victims girl accused of sexually assaulting babush monserrate Dainik Gomantak
गोवा

बाबूश यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडित मुलीला समन्स जारी करण्याची विनंती

मोन्सेरात यांच्याविरुद्ध न्यायालयात लैंगिक अत्याचार तसेच पोक्सो कायद्याखाली सुमारे 250 पानी आरोपपत्र सादर केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजीचे आमदार आतानासिओ ऊर्फ बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात सहा वर्षांपूर्वी कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी पीडित मुलीला न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी करण्याचा विनंती अर्ज संशयित रोझी फेरोझ हिने केला आहे.

मोन्सेरात यांच्याविरुद्ध न्यायालयात लैंगिक अत्याचार तसेच पोक्सो कायद्याखाली सुमारे 250 पानी आरोपपत्र सादर केले आहे. त्यामध्ये मोन्सेरात यांच्यासह रोझी फेरोझ हिचाही समावेश आहे. याप्रकरणी सुमारे 40 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मोन्सेरात यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. अत्याचाराची घटना घडल्यानंतर तीन महिन्यांनी हा प्रकार पीडित मुलीने अपना घरमध्ये असताना दिलेल्या जबानीतून उघडकीस आला होता.

आरोपपत्रावरील सुनावणीनंतर न्यायालयाने बाबूश मोन्सेरात आणि रोझी फेरोझ या दोघांविरुद्ध आरोप निश्‍चितीचा आदेश दिला होता. या आदेशाला मोन्सेरात यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. मात्र, हा अर्ज मोन्‍सेरात यांनी मागे घेतल्यावर न्यायालयाने मोन्सेरात यांच्यासह इतर संशयितांविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे आरोप निश्‍चित करून खटल्यावरील सुनावणी सुरू केली होती.

11 डिसेंबरला अर्जावर सुनावणी

18 ऑक्टोबरला न्यायालयात साक्ष देण्यासाठी पीडित मुलीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्या दिवशी न्यायालयाला अचानक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने ती सुनावणी झाली नव्हती. संशयित रोझी फेरोझ हिने न्यायालयात अर्ज सादर करून पीडित मुलीला सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी करण्याची मागणी केली आहे. या अर्जावरील सुनावणी 11डिसेंबरला ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT