Subhash Phaldesai
Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Saptakoteshwar Temple : सप्तकोटेश्वर मंदिराचे नुतनीकरण पूर्ण; लोकार्पणाला छत्रपतींचे वंशज राहणार उपस्थित

गोमन्तक डिजिटल टीम

Saptakoteshwar Temple : पोर्तुगीज काळात उद्ध्वस्त केलेल्या 19 मंदिरांच्या पुनरुत्थानासाठी अर्ज आले असून यासंबंधी सहाजणांची तज्ज्ञ समिती अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज दिली.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुनर्बांधणी केलेले नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून 11 फेब्रुवारी रोजी या मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पोर्तुगिजांच्या राजवटीत शेकडो मंदिर उद्ध्वस्त करण्यात आली. गोवा मुक्तीनंतर यासंदर्भात कोणताच निर्णय झाला नाही. आता यासंदर्भात कागदोपत्री, लेखी, प्राचीन पुरावे सादर करावेत, असे आवाहन पुरातत्व खात्याने केले होते. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आतापर्यंत यासाठी 19 अर्ज आले असून ते विविध सामाजिक संस्था, बिगर सरकारी संस्था आणि व्यक्तिगत स्वरूपात नागरिकांनी केले आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या वतीने नेमलेली सहा तज्ज्ञ व्यक्तींची समिती अंतिम निर्णय घेणार आहे.

हा अंतिम निर्णय राज्य सरकारला मान्य असेल. त्यानंतर सरकार यावर अंमलबजावणी आणि कार्यवाही करेल, असे पुरातत्व खात्याचे मंत्री फळदेसाई म्हणाले. यामध्ये प्रामुख्याने बार्देश, सासष्टी, तिसवाडी या तालुक्यांमधील मंदिरांचा समावेश आहे.

12 रोजी सप्तकोटेश्वर मंदिराचे लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुनर्बांधणी केलेले नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून 11 फेब्रुवारी रोजी या मंदिराचे लोकार्पण करण्यात येईल. यासाठी 9 फेब्रुवारीपासून धार्मिक विधी सुरू होतील.

गोव्याबरोबर महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील पवित्र जलाचा सप्तकोटेश्वराला अभिषेक करण्यात येईल. यासाठी छत्रपतींचे वंशज शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहाणार आहेत, असेही मंत्री फळदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT