Goan Singer Hema Sardesai Dainik Gomantak
गोवा

शासकीय कामकाजातून ‘विधवा’ शब्द काढा

महिला संसदेत हेमा सरदेसाईंची पंतप्रधानांना विनंती

दैनिक गोमन्तक

पणजी: महिलांना सन्मानाने जगण्यासाठी तिच्या कुटुंबीयांची, नवऱ्याची गरज, साथ असते, पण नवऱ्याच्या मागे तिला ‘विधवा’ म्हटले जाते. त्यामुळे तिच्या उर्वरित आयुष्याच्या खच्चीकरणाला सुरवात होते, तेव्हा हा शब्द सर्व सरकारी कामकाजातून काढून टाकावा. मानवी जगण्यासाठी ही संकल्पना अत्यंत क्रूर आहे आणि यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती प्रसिद्ध गोमंतकीय गायिका हेमा सरदेसाई यांनी केली आहे.

राज्य सरकार, गोवा विधानसभा आणि एमआयटी पुणे यांच्यावतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय महिला संसदेच्या समारोप सभारंभात हेमा सरदेसाई बोलत होत्या. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, एमआयटीचे अध्यक्ष राहुल कराड, वीजमंत्री नीलेश काब्राल, स्मार्ट व्हिलेजचे डॉ. जगत शहा उपस्थित होते.

महिलांचा सन्मान राखण्यासाठी प्रयत्न व्हावे’

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, की नव्या युगातील महिला अत्यंत खंबीर होत आहेत. त्या चळवळीत सहभागी होत आहेत. समाजातील महिलांची भूमिका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना घडवण्यामध्ये जिजाऊंचा मोठा वाटा होता. त्यामुळे महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

महिलांच्या सशक्तीकरणामध्ये स्वयंसहाय्य गटांचे योगदान मोठे आहे. या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला जागतिक बाजारपेठ आहे. यासाठी महिलांनी तेच ते करण्यापेक्षा नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करावी आणि त्याला जागतिक बाजारपेठेची जोड द्यावी. हे युग तंत्रज्ञानाचे आणि डिजिटलचे आहे याचाही फायदा जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी होईल. - डॉ. जगत शहा, संस्थापक स्मार्ट व्हिलेज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT