road damage Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमधील रस्त्यांची दूरवस्था

विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले होते.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: पर्वरीतील ओ कोकेरो सर्कल ते सांगोल्डामार्गे साळगाव आणि कळंगुट येथील सेंट आलेक्स चर्च परिसर अशा चोगम रोड नावाने ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. तसेच कळंगुट नाईकवाड्यातील पोलिस स्थानक ते सेंट आलेक्स चर्चपर्यंतचा रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले होते. परंतु नवीन सरकार स्थापन झाले तरी कळंगुटमधील रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याने सामाजिक कार्यकर्ते सूरज नाईक कळंगुटकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

सध्या राज्यात पर्यटन हंगाम सुरू असल्याने दिवसाकाठी हजारो पर्यटकांची रिघ कळंगुट परिसरात लागलेली असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने येथील रस्त्यांची त्वरित डागडुजी करून डांबरीकरण करण्याची मागणी वाहनचालक तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: दिवाळी म्हणजे काय, 'नरकासुर का?' असे एकाने विचारले; लोप होण्याच्या मार्गावरील वारसा

Horoscope: अद्भुत त्रिग्रही योग! 'या' राशींना दिवाळीत मिळणार आनंदवार्ता; सुटणार मोठी समस्या

C K Nayudu Trophy: गोव्याला मोठा फटका! पहिल्याच लढतीत पराभव; झारखंडचा 113 धावांनी एकतर्फी विजय

T20 Cricket Tournament: शेवट गोड! गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंची दिवाळी, आसामवर केली मात

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

SCROLL FOR NEXT