Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: "ठिकाण लक्षात ठेवा! सभा साखळीतच होणार, मुख्यमंत्र्यांमध्ये दम असेल तर..."

म्हादई आमची आई आहे आणि तिच्या बचावासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज आहे- महेश म्हांब्रे

गोमन्तक डिजिटल टीम

साखळीत ‘म्हादई बचाव’ बॅनरखाली राज्यभरातील आंदोलकांनी सभेची जय्यत तयारी सुरू केली असतानाच, गुरुवारी एकाएकी या सभेला दिलेली परवानगी साखळी पालिकेने मागे घेतली. 'म्हादई बचाव’ सभेला देण्यात आलेली परवानगी मागे घेतल्याने राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. तसा आदेशही साखळीचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांनी जारी केला आहे. त्यामुळे ''म्हादई''च्या अस्तित्वासाठी पुढे सरसावलेल्या म्हादईप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

परिणामी म्हादई प्रेमींनी एकत्र येत सभा ठरलेल्या ठिकाणी होणारच असा पवित्रा घेतला आहे. या प्रश्नी बोलताना गोवा फॉवर्डचे दुर्गादास कामत यांनी ceo कबीर शिरगांवकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. "तुम्ही जनतेचे सेवक आहेत. तुम्ही जनतेच्या प्रश्नासाठी जनतेसोबत राहणे आवश्यक आहे. मात्र तुम्ही ‘म्हादई बचाव’ सभेला देण्यात आलेली परवानगी मागे घेतल्याचा आदेश काढलात. आम्ही तुम्हाला इशारा देतो कि तुमच्या या निर्णयांना आम्ही घाबरणार नसून सभा ठरलेल्या ठिकाणीच होणार" असल्याचे दुर्गादास कामत यांनी यांनी सांगितले.

"म्हादई प्रश्नी जनतेला मी आव्हान करतो कि आता एकत्र लढण्याची वेळ आली आहे. म्हादई आमची आई आहे आणि तिच्या बचावासाठी आणि तिच्या जपणुकीसाठी जनतेने एकत्र येण्याची गरज आहे. ‘म्हादई बचाव’ सभेला देण्यात आलेली परवानगी मागे घेतली असली तरी सभा ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी, साखळीतच होणार. मुख्यमंत्री सावंत यांच्यात दम असेल तर त्यांनी सभेच्या ठिकाणी येऊन दाखवावे." असा इशारा महेश म्हांब्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

कर्नाटकच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित अहवालास केंद्रीय जलशक्ती आयोगाने मान्यता दिल्यानंतर गोव्यात वातावरण तापले आहे. म्हादईच्या अस्तित्वासाठी राज्यभर जनजागृतीही होत असून, व्यापक लढ्याची तयारीही सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT