Remal Cyclone Dainik Gomantak
गोवा

Remal Cyclone: 'रेमल' चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम शक्‍य, पुढील तीन दिवस गोव्यात पावसाची शक्यता

Remal Cyclone: 23 आणि 24 मे असे दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Remal Cyclone

बंगालच्या उपसागरात ‘रेमल’ चक्रीवादळ तयार होत असून त्‍याचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीवर धडकले तर त्‍याचा मान्‍सूनवर परिणाम होऊ शकतो. ते म्यानमारच्या दिशेने वळले तर कदाचित मान्सूनला आणखी विलंब होऊ शकतो.

याबाबत गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, टर्फ, चक्रीय वारे अशा विविध कारणांमुळे पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. तसेच २३ आणि २४ मे असे दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

"हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार अजून ‘रेमल’ चक्रीवादळ तयार झालेले आहे. परंतु तसे होण्याची शक्यता आहे. कारण बंगालच्‍या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. यावर हवामान खाते लक्ष ठेवून आहे," असे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी म्हणाले

सत्तरी, काणकोणात विजेचा खेळखंडोबा

राज्‍यात संध्‍याकाळच्‍या वेळी गडगडाटासह पाऊस पडत असल्‍याने अनेक ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा झाला आहे.

सत्तरीतील वाळपई, पर्ये, झर्मे, म्‍हाऊस, चिंचमळ, साखळी तसेच माशेल-खांडोळा, तांबडी-सुर्ला, धारबांदोडा, हरमल, काणकोण, सांगे, केपे आदी भागात झाडांची पडझड होऊन तासन्‌तास वीज गायब होत आहे. साहजिकच उकाड्यामुळे नागरिक त्रस्‍त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

Virat Kohli Net Worth: लक्झरी लाईफस्टाईल, ब्रँड एंडोर्समेंटमधून कोट्यवधींची कमाई, आलिशान कारचं कलेक्शन; किंग कोहलीची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क!

डिजिटल क्षेत्रात 'WISE' ची क्रांती! बातमी निर्मिती आता होणार 'सुपरफास्ट'; Oneindia ने विकसित केला नवा AI प्लॅटफॉर्म

पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

कोहली म्हणाला, ''रुको, मार्कर लेके आता हूँ!'' 4 तास घराबाहेर बसलेल्या चाहत्यासाठी स्वतः धावला; किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, 'हाच खरा किंग'

SCROLL FOR NEXT