Old Goa Exposition Ceremony Fr. Henry Falcao Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Old Goa Exposition Ceremony Fr. Henry Falcao: सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवू असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

Akshata Chhatre

Fr. Henry Falcao on Old Goa Exposition Ceremony

ओल्ड गोवा: गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शनाची चर्चा सुरु होती. आंतराष्ट्रीय स्थरावर या सोहळयाला एक महत्व प्राप्त आहे. केवळ देशभरातूनच नाही तर विदेशातून देखील अनेक भाविक गोव्यात सेंट झेवियर यांच्या शव प्रदर्शनाला उपास्थित राहत आहेत. गुरुवारी (दि. 21 नोव्हेंबर) रोजी सकाळी 9:30 वाजता या शव प्रदर्शन सोहळ्याला सुरुवात झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी देखील चर्चमध्ये हजेरी लावत पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले.

"या पवित्र सोहळ्याबद्दल बोलताना फादर हेन्री फाल्काओ म्हणालेत की हे प्रदर्शन गेल्या अनेक वर्षांपासून हे पवित्र शव प्रदर्शन गोव्याच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग बनून आहे. अनेकवेळा त्यांचं पवित्र शरीर पुरून सुद्धा ते शरीर खराब झालं नाही, हा खऱ्या अर्थाने दैवी चमत्कारच आहे.

हा एक धार्मिक सोहळा आहे, याचे व्यव्यसायीकरण करू नये. गेल्या काही वर्षांत हा सोहळा आंतराष्ट्रीय स्थरावर जाऊन पोहोचला आहे, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हा सोहळा महत्वपूर्ण आहे. यामुळे धार्मिक संबंध मजबूत व्हायला मदत होते."

या सोहळ्याबद्दल बोलताना मुखमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की कित्येक दिवसांपासून समिती या शव प्रदर्शनाच्या कामात जुंपली आहे, अनेकांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न केले आहेत. पुढे मुख्यमंत्र्यांनी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या लाईट अँड साऊंड शोबद्दल माहिती दिली. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करून दाखवू असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT