women
women 
गोवा

आत्मसन्मान...

रेखा डायस

हल्ली व्हॉटस्ॲपवर नवरा-बायकोच्या नात्याचे भरपूर जोक्स येत असतात. त्यात जास्त करून नवरा बायकोला कसा भीत असतो किंवा बायको नवऱ्यावर किती जाच करत असते आणि ती कशाप्रकारे नवऱ्याचा छळ करत असते, नवरा कसा बिचारा गरीब असतो असा मतितार्थ, असणारेच मेसेज सतत येत असतात.

पण वास्तवात तसे नाही ऐंशी-नव्वद टक्के घरातल्या स्त्रिया दबलेल्या वातावरणात असतात नवऱ्यापुढे तर कोणी सासू-सासऱ्यापुढे तर कोणी घरातील एखादी वरचढ स्त्री पुढे खूप बारीक सारीक गोष्टीचे निर्णय स्वातंत्र्य त्यांना नसते. घरातील छोट्या-छोट्या गोष्टींंचे निर्णय त्या नवऱ्याला विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. यात शिकलेल्या स्त्रियापण असतातच. एवढेच काय नोकरी करणाऱ्या स्त्रियांनाही आपला पगार आपल्यावर खर्च करण्याची मोकळीक नसते. म्हणजे त्या स्वतःहून खर्च करीत नाहीत. मागे एकदा व्हॉट्‌सॲपवर मेसेज आला होता. एका बाईची सतत कुचंबना होत असे. नवऱ्याची सतत चिडचिड, खर्चाची काटकसर, कधी बाहेर फिरणे नाही. तर कधी हौसमौज नाही. सततच्या टेन्शनमुळे ती आजारी पडली. नवऱ्याने डॉक्टरकडे नेले नाही. मग ती एकटीच गेली. आजार काय आहे ते तिला कळले. आणि लवकरच ती अटॅक येऊन मेली. नंतर तिची रोजनिशी वाचल्यावर नवऱ्याला त्याची चूक कळली. पण तोवर खूप उशिर झाला होता.

माझ्या ओळखीची बाई आहे. तिला घरात सगळे सुख आहे. नवरा पण तिच्यावर प्रेम करतो पण तो रात्री जेव्हा दारू पिऊन येतो तेव्हा तिला त्याचे मूड्‌स सांभाळावे लागतात. तिला अपमान सहन करावा लागतो. हा पण प्रकारचा त्रासच आहे. कोणाकोणा नवऱ्यांचे बाहेर संबंध असतात. अशाप्रकारचे अत्याचार खूप बायका सहन करत असतात. ती मुलांमध्ये, आपल्या संसारामध्ये गुरफटलेली असते. एवढ्या-तेवढ्या कारणावरून ती घराबाहेर नाही जाऊ शकत. जरी असे खूप म्हटले जाते, ‘मुलगी शिकली,, स्वतंत्र झाली’ तिचे ती निर्णय घ्यायला मोकळी. हे सगळे खरे असले तरी जेव्हा एवढ्या-तेवढ्या कारणावरून घरात नवरा-बायकोचे भांडण होते तेव्हा नवरा घराबाहेर जातो. आपल्या मित्रांना भेटतो ३-४ दारूचे पेग पिऊन पाहिजे तेव्हा रात्री घरी येतो. त्याला अपवादही असतात. सगळेच पिणारे नसतात. पण तसे स्त्री नाही करू शकत. ती घराबाहेर नाही पडू शकत.

शहरातल्या स्त्रियातरी थोड्याफार प्रमाणात स्वतंत्र आहेत. त्या आपल्यासाठी वेळ काढतात. कधी मैत्रिणींबरोबर सिनेमाला जातात. पण खेड्यातल्या स्त्रिया तर स्वतंत्रपणे जात नाहीत. तर त्या आपल्यासाठी वेळ काय देणार? बायकांनी स्वतंत्र जगायचे असते. हेच काही स्त्रियांना माहीत नाही. GSRLM (GOA STATE RURAL LIVELYHOOD MISSION) ची शक्ती बचत गट संघटना तयार  व्हायला लागल्या आहेत. त्या स्त्री शक्ती एकत्र होण्यासाठी खूप मदत करत आहेत. बायकांनी एकत्र येऊन काही काम करणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहाणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. प्रत्येक शिकलेल्या सुसंस्कृत बाईने अशा स्त्री बचत गटाची स्थापना करून अशिक्षित बायकांना पुढे आणले पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT