goa hotel Dainik Gomantak
गोवा

Panaji News : 5922 खासगी हॉटेल्सची ‘पर्यटन’कडे नोंदणी; पर्यटन उपसंचालक राजेश काळे

Panaji News : अनधिकृत आस्थापनांवर करडी नजर

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, राज्य सरकारला भरघोस महसूल मिळत असल्याने पर्यटन विभागाकडून खासगी हॉटेलच्या नोंदणीवर काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. अनधिकृत हॉटेल आस्थापनांवर पर्यटन खात्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

मार्च २०२३ पर्यंत पर्यटन विभागाकडे एकूण ५९२२ खासगी हॉटेल्सची नोंदणी झाली आहे,अशी माहिती पर्यटन उपसंचालक राजेश काळे यांनी दिली.

गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देतात. गोव्यात आलेले अनेक पर्यटक गोव्यात हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये काही दिवस मुक्काम करतात.

हा निकष लक्षात घेऊन पर्यटन विभागाने खासगी हॉटेल्सना पर्यटन विभागाकडे नोंदणी करून शुल्क भरणे बंधनकारक केले आहे. काळे यांनी सांगितले, की, खासगी हॉटेल्सनी पर्यटन विभागाकडे 'गोवा नोंदणी पर्यटन व्यापार कायदा, १९८२ आणि नियम, १९८४' अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोणतेही खासगी हॉटेल विभागाकडे नोंदणीकृत नसल्याचे आढळून आल्यास त्या हॉटेलला मोठा दंड आकारण्यात येतो.

हॉटेल्सची ४ श्रेणींमध्ये विभागणी

हॉटेल्सच्या ‘अ’, ‘ब’​, ‘क’, ‘ड’ अशा चार श्रेणींमध्ये हॉटेल्सची विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ श्रेणीमध्ये ९८९६ खोल्या आणि १६१९१ बेडची ८५ हॉटेल्स आहेत. ‘ब’ श्रेणीमध्ये १२४६१ खोल्या आणि १९७२९ बेडची २६९ हॉटेल्स आहेत.

‘क’ श्रेणीमध्ये, २७७२१ खोल्या आणि ४३९४९ बेड असलेली २४५६ हॉटेल्स आहेत. श्रेणी ‘ड’ मध्ये, १०१६६ खोल्या आणि १५९८४ बेड असलेली ३११२ हॉटेल्स आहेत. मार्च २०२३ पर्यंत पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत एकूण ६०२४४ खोल्या आणि एकूण ९५८५३ खाटांची एकूण ५९२२ हॉटेल्स आहेत,असे राजेश काळे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Live News Updates: पणजीतील दिवजा सर्कल येथे कार आणि दुचाकीमध्ये अपघात

SCROLL FOR NEXT