Goa Government | Register otherwise pay fine  Dainik Gomantak
गोवा

नोंदणी करा, अन्यथा दंड भरा: गोवा सरकार

पर्यटन व्यावसायिकांना सरकारकडून इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्य सरकारने पर्यटन क्षेत्रात सुसूत्रता आणण्याकरिता सर्व व्यावसायिकांना नोंदणी व नुतनीकरण सक्तीचे केले आहे. अनेकजण व्यवसायाची नोंदणी करत नाही व नोंदणीची मुदत संपल्यानंतर त्याचे नुतनीकरण करत नाही अशा व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. या कारवाईसाठी अधिकाधिक एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची नोटीस पर्यटन खात्याने जारी केली असून 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्यात कोविड काळात पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू झाला असला, तरी अनेकांनी बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरूच ठेवला आहे. गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायद्यानुसार पर्यटन संबंधित असलेला व्यवसाय सुरू करणाऱ्यांना त्याची नोंदणी पर्यटन खात्याकडे करणे सक्तीचे आहे. त्यामध्ये हॉटेल, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, मोटार बोट व लाँच, जलक्रीडा ऑपरेटर्स, हस्ककला डिल, टुरिस्ट गाईड, फोटोग्राफर, सरकारी शॅक, खासगी शॅक, खासगी कुटीरे, डेकबेडस् व छत्र्या, ॲडव्हेंचर स्पोर्टस्, स्पाईस प्लांटेशन, ऑनलाईन सेवा पुरवठादार यांचा यामध्ये समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

SCROLL FOR NEXT