Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: सुमंता फर्नांडिसचा मृतदेह तीन महिने शवागारातच; गोवा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Goa Crime News: आईची मागणी मृत्‍युप्रकरणी 48 तासांत खुनाचा गुन्‍हा नोंदवा

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: सध्‍या नवेवाडे-वास्‍काे येथील दुहेरी जळीतकांड प्रकरण गाजत असतानाच तीन महिन्‍यांपूर्वी नुवे येथे जळून मृत्‍यू आलेल्‍या सुमंता फर्नांडिस हिचे मृत्‍यू प्रकरणही पुन्‍हा चर्चेत आले आहे. आपल्‍या मुलीला तिच्‍या सासरच्‍याच लोकांनी जाळून मारले आहे,

असा आरोप तिची आई मारिया फर्नाडिस यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधितांवर 48 तासांच्‍या आत हुंड्यासाठी छळ आणि खुनाच्‍या आरोपाखाली गुन्‍हा नोंद करा, अशी मागणी करणारे एक निवेदन दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

दरम्‍यान, मंगळवारी (ता.२८) सुमंताच्‍या आईसह प्रतिमा कुतिन्‍हो यांनी मायणा-कुडतरी पाेलिस स्‍थानकाला भेट देऊन निरीक्षक अरुण देसाई यांची भेट घेतली. याप्रकरणी सुमंताचा नवरा नोएल ब्रागांझा आणि त्‍याच्‍या आईवर गुन्‍हा नोंद करा, अशी मागणी त्‍यांनी केली.

जोपर्यंत गुन्‍हा नोंद केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्‍यात घेणार नाही, अशी भूमिका तिच्‍या आईने घेतल्‍याने मागचे तीन महिने सुमंता हिचा मृतदेह गोमेकॉच्‍या शवागृहात पडून आहे.

त्यांनीच सुमंताला जाळून मारले

सुमंता हिचे सात वर्षांपूर्वी नोएल याच्‍याशी लग्‍न झाले होते. तीन महिन्‍यांपूर्वी तिने स्‍वत:ला जाळून घेतल्‍याने मृत्‍यू झाल्‍याचा तिच्‍या घरच्‍या लोकांनी दावा केला हाेता. तिला चार वर्षांची एक मुलगीही आहे. सुमंता हिने केलेली आत्‍महत्‍या नसून तिला मुद्दामहून जाळून मारण्‍यात आले, असा आरोप सुमंताच्‍या आईने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT