काँग्रेसला (Congress) रामराम करून आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश करणार अशी जी चर्चा चालू होती त्याला आमदार लॉरेन्स यांनी आज त्यांच्या वाढदिनी विराम दिला.  Dainik Gomantak
गोवा

Goa Election: रेजिनाल्ड काँग्रेस मध्येच राहणार, वाढदिवशी घोषणा

विरोधी पक्षनेते कामत (Opposition leader Digambar Kamat) यांनी रेजिनाल्ड (Alex Reginald Lawrence) पक्ष सोडून जाणार नाहीत याची आपल्याला मनोमन खात्री होती. त्यांच्या या निर्णयाने पक्षाचे मनोबल अधिक मजबूत झाले आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील (Goa) स्थानिक काँग्रेस (Congress) नेतृत्वाला कंटाळून कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Alex Reginald Lawrence) हे काँग्रेसला रामराम करून आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश करणार अशी जी चर्चा चालू होती त्याला आमदार लॉरेन्स यांनी आज त्यांच्या वाढदिवशी विराम दिला. आपण काँग्रेस सोडून जाणार नाही तर काँग्रेसमध्ये राहूनच भाजपला (BJP) विरोध करणार हे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या बरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेजिनाल्ड यांनी ही घोषणा केली. गोव्याला भाजपपासून वाचवायचे हे एकमेव ध्येय ठेवून आपली पुढील वाटचाल असेल असे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी लॉरेन्स हे पक्षाचे महत्त्वाचे नेते असून ते पक्षाचा चेहरा आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन पक्षश्रेष्ठींनी दिले असून भविष्यात त्यांना त्यांना पक्षात मानाचे पद दिले जाईल असे सांगितले.

विरोधी पक्षनेते कामत यांनी रेजिनाल्ड पक्ष सोडून जाणार नाहीत याची आपल्याला मनोमन खात्री होती. त्यांच्या या निर्णयाने पक्षाचे मनोबल अधिक मजबूत झाले आहे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT