goa-medical-college-and-hospital Dainik Gomantak
गोवा

'गोमेकॉ' प्रवेशद्वाराबाहेर पुन्हा अतिक्रमण

उपजिल्हाधिकाऱ्यांची डोळेझाक: भाजी-फळे विक्रेत्यांचा पार्किंग क्षेत्रात व्यापार

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या प्रवेशद्वारावरील परिसरात अतिक्रमण केलेल्या भाजी व फळे विक्रेत्यांना गेल्या पावसाळ्यात हटवण्यात आले होते; मात्र पुन्हा त्यांनी त्याच ठिकाणी अतिक्रमण करून व्यापार सुरू केला आहे. त्यांनी सुरू केलेल्या व्यापारामुळे पुन्हा प्रवेशद्वारावरील रस्त्यावर लोकांची व वाहनांच्या वर्दळ वाढू लागली आहे. तिसवाडी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून मात्र त्याकडे डोळेझाक केली जात आहे.

या गोमेकॉ प्रवेशद्वाराच्या बाहेर सर्व व्यापाऱ्यांना गेल्यावर्षी जुलै महिन्यात उपजिल्हाधिकाऱ्यांनी हटविले होते. त्यांना सध्या कायमस्वरुपी गाळे बांधून देण्यात आले आहेत मात्र त्याचे वितरण झालेले नाही. गेल्या काही महिन्यांपासून या प्रवेशद्वाराबाहेर मोटार सायकल स्टॅण्ड आहे त्या ठिकाणी काही महिलांनी भाजी विक्री सुरू केली व हळूहळू त्या ठिकाणी आता एकामागोमाग इतर भाजी व फळे विक्रेत्यांनीही आपापला व्यापार सुरू केला आहे.

तेथील मारुदी देवळाच्या परिसरातील जागा ही वाहनांच्या पार्किंगसाठी आरक्षित केली असताना त्या जागेवर आता या विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण पूर्वीच्या विक्रेत्यांनी नव्हे तर कुडका येथील काही महिलांनी केले आहे. त्यामुळे वाहन पार्किंगसाठी असलेल्या जागेत तेथे या भाजी व फळे विक्रेत्यांनी व्यापार व्यापल्याने वाहन चालकांना वाहने उभी करण्यासाठी अडचणी येत आहेत. पार्किंगमध्ये सुरू केलेल्या व्यापारामुळे इस्पितळात येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांची तसेच वाहनांना तेथे रस्त्यावरून जाताना मुष्किलीचे बनले आहे.

पार्किंगच्या जागेत हे भाजी व फळे विक्रेते जबरदस्तीने तेथे प्लास्टिकचे बॉक्स ठेवून अतिक्रम करत आहे व व्यापार मांडत आहेत. वाहन चालक तसेच लोक खरेदी करण्यासाठी तेथे गर्दी करत असल्याने ज्या कारणासाठी तेथून अतिक्रमण केलेल्या या व्यापाऱ्यांना तेथून हटवण्यात आले होते त्याचा उद्देश सफल झालेला नाही. ज्यांना अतिक्रमण केले म्हणून तेथून हटवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT