Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

इंधन शुल्क कपातीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले स्वागत

बिगर भाजपशासित राज्यांना लगावला टोला

दैनिक गोमन्तक

देशभर महागाईचा आलेख चढा असताना केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात केली.यामूळे महागाई कमी होण्यास मदत होणार आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वागत केले. ( Reduction in fuel prices is very welcome -Pramod Sawant )

याबाबत मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारच्या या निर्णयामूळे राज्यातील महागाई कमी होण्यास मदत होईल. महागाईने सामान्य नागरिकांचे अर्थिक गणित कोलमडले असताना मोदी सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. असे म्हटल्याने न कळत का असेना महागाई वाढल्याचे मान्य केले आहे.

बिगर भाजपशासित राज्यांना लगावला टोला

यावेळी बोलताना म्हणाले कि, भाजपशासित राज्यांनी यापूर्वीच किमती आणखी कमी केल्या आहेत. याचा परिणाम त्या - त्या राज्यातील महागाई कमी होण्यास मदत झाली आहे. असाच निर्णय इतर पक्षशासित राज्यांनी घेता येईल का यावर विचार करणे आवश्यक आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच या राज्यांनी याचा विचार करावा असे ही ते म्हणाले.

रविवारसाठी सरकारी तेल कंपन्यांनी प्रसिद्ध केलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल शनिवार, 21 मे रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेल 6 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली. करात कपात केल्यानंतर पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले. वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना सरकारच्या या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आज, रविवारसाठी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. गोव्यात पेट्रोल 97.90 तर डिझेल 90.44 दराने विकले जात आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT