Health service |Goa  Dainik Gomantak
गोवा

Health Service: आरोग्यविषयक सेवेत रेडक्रॉस अग्रभागी

राज्यातील आरोग्य यंत्रणेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करण्यामध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या गोवा शाखा आदर्शवत काम करत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Health Service: राज्यातील आरोग्य यंत्रणेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करण्यामध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या गोवा शाखा आदर्शवत काम करत आहे.

विद्यार्थी कामगारांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती आणि विविध वैद्यकीय साधने, औषधे आणि पोषक अन्नपुरवठा केला जात असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष मांगिरीश पै रायकर यांनी दिली आहे.

रायकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीची गोवा शाखा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि अध्यक्ष गौरीश धोंड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. रेड क्रॉस सोसायटी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेला पूरक काम करत आहे.

राज्यभर पसरलेल्या सात शाखांमधील स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे काम सुरू असून प्रामुख्याने विद्यार्थी, कामगार आणि गरजू नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती, प्रथमोपचार प्रशिक्षण दिले जात आहे.

विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांमधील कामगार, कर्मचारी, क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषक आहार पुरवठा केला जात आहे.

सात शाखांमधून सक्रिय

रेड क्रॉस संस्थेच्या राज्यात सात शाखा असून या शाखांमार्फत स्वयंसेवकांच्या सहाय्याने विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. यात बार्देश, फोंडा, साष्टी, मुरगाव, डिचोली, सत्तरी आणि पेडणे या शाखांचा समावेश होतो.

रेडक्रॉस संस्थेने राबवलेले उपक्रम

  • महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील नागरिकांना 162 हायजिन कीट वितरण.

  • गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांकरता 660 हायजिन कीट वितरण.

  • औद्योगिक वसाहत आणि विविध हॉटेलमध्ये 16 ठिकाणी प्रथमोपचार प्रशिक्षण कोर्स.

शिक्षकांकरिता कार्यशाळा

  • गोमेकाॅतील ओपन हार्ट सर्जरी करता 14 इच्छुक रक्तदात्यांकडून रक्तपुरवठा.

  • दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यात 140 शिक्षकांकरिता कार्यशाळा

  • 11 आणि 12 मधील विद्यार्थ्यांकरीता आरोग्य विषयक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन.

  • राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोषण आहार कीट वितरण.

  • मोफत डोळे आणि मोतीबंदू चिकित्सा शिबिरांचे आयोजन.

  • मोफत रक्तदाब आणि आरोग्य विषयक तपासणी शिबिरांचा आयोजन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT