Red Chilies in Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत गावठी मिरची झाली ‘तिखट’

दर वधारला : अवकाळी पाऊस, तसेच विविध रोगांचा परिणाम

दैनिक गोमन्तक

डिचोली : पावसाळा अवघ्याच दिवसांवर येऊन ठेपल्याने डिचोलीत लाल मिरचीची आवक वाढली आहे. बुधवारी आठवडी बाजारात स्थानिक गावठी मिरचीसह राज्याबाहेरील मिरची मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होती. मात्र, राज्याबाहेरील मिरचीच्या तुलनेत स्थानिक गावठी मिरचीचे दर वधारल्याचे दिसून आले. गावठी मिरचीचे दर ऐकताच ग्राहकांच्या कपाळावर आठ्या पडत होत्या.

विविध रोगांचा प्रादुर्भाव त्यातच ‘अवकाळी’मुळे यंदा मिरची पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा स्थानिक मिरची महाग झाली आहे, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. राज्याच्या विविध भागांतून येणारी मिरची यंदा महागली आहे. सध्या स्वच्छ न केलेली (देठ न काढलेली) मिरची 800 ते एक हजार रुपये प्रतिकिलो या दराने विकण्यात येत आहे.

गेल्या वर्षी मिरचीचे दर 600 रुपये प्रतिकिलो होते. सध्या बांदा आणि जांबोटी भागातील मिरचीचे दर 250 ते 300 रुपये प्रतिकिलो असे आहेत. डिचोलीसह पेडणे, बार्देश, सत्तरी आदी राज्यांतील काही भागांत पिकणारी गावठी मिरची बाजारात येत असली, तरी तिचे प्रमाण कमी आहे. राज्यातून उपलब्ध होणाऱ्या मिरचीपेक्षा कर्नाटकातील जांबोटी आणि महाराष्ट्रातील बांदा आदी भागातून उपलब्ध होणाऱ्या मिरचीचे प्रमाण अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT