Goa IFFI 2024 Registration  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2024: 'इफ्फी'ची विक्रमी नोंदणीकडे वाटचाल! अनुपम खेर घेणार 'मास्टर क्लास'; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ने उघडणार पडदा

Goa IFFI 2024: २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची तयारी सध्या सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रतिनिधी नोंदणीत मोठी वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Iffi 2024

पणजी: इफ्फीसाठी यंदा चित्रपटप्रेमी, विद्यार्थी आणि चित्रपट तज्ज्ञांकडून मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे. शनिवारपर्यंत महोत्सवासाठी तब्बल ३,६५९ जणांनी नोंदणी केली आहे. यापुढेही नोंदणी होईल. ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने आधीच महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. त्यामुळे यावर्षी विक्रमी संख्येने प्रतिनिधींची नोंदणी होण्याची शक्यता आहे.

२० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या महोत्सवाची तयारी सध्या सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा प्रतिनिधी नोंदणीत मोठी वाढ झाली आहे.

या ३,६५९ प्रतिनिधींमध्ये देश-विदेशातील चित्रपट अभ्यासक, चित्रपटप्रेमी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, यंदाचा इफ्फी प्रचंड यशस्वी ठरणार आहे. याव्यतिरिक्त माध्यम प्रतिनिधींनीही या महोत्सवाच्या वृत्तांकनासाठी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. यात डिजिटल मीडियाचे ३०, मीडिया कॅमेरापर्सन ३३ तर मीडिया प्रतिनिधी म्हणून १९० जणांनी नोंदणी केली आहे.

‘मास्टर क्लास’मध्ये अनुपम खेर

प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचा ''पॉवर ऑफ फेल्यूर'' विषयावर कला अकादमीत २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत मास्टर क्लास होणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षी एक खास पाहुणा म्हणून अनुपम खेर यांची उपस्थिती लाभणार आहे. अनुपम खेर यांनी ३५ वर्षांच्या काळात ५४० हून अधिक चित्रपट आणि १०० नाटकांमध्ये काम केले आहे.

‘कंट्री ऑफ फोकस’साठी ऑस्ट्रेलियाची निवड

यंदाच्या इफ्फीचे उदघाटन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. यंदा ऑस्ट्रेलियाला ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवडले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT